सैतवाल जैन समाजातील कार्यकर्त्यांनी जनगणनेची नोंदणी करावी : घेवारे
-----------------------
कडा / वार्ताहर
-------------
सैतवाल जैन समाजाचा एकही व्यक्ति जनगणना नोंदणीपासून वंचित राहू नये. म्हणून सैतवाल जैन समाजातील कार्यकर्त्यांनी गल्ली ते दिल्लीत तळागाळात जाऊन जनगणनेची नोंदणी करुन घ्यावी. असे आवाहन अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप घेवारे यांनी ठाण्यात आयोजित कार्यक्रमात केले आहे.
अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेचा राज्यस्तरिय मेळावा व कार्यकारणीची बैठक रविवारी ठाणे येथील शंकेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिरात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी सैतवाल जैन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप घेवारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे व कार्यकारिणी सभेचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी या संस्थेचे महामंत्री नितीन नखाते यांनी संस्थेच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात सैतवाल संस्थेच्या जिल्हाध्यक्षांची निवड करुन दिलीप घेवारे यांचे हस्ते नुतन जिल्हाध्यक्षांना प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी घेवारे यांनी सैतवाल जैन समाजाचा एकही व्यक्ति जनगणना नोंदणीपासून वंचित राहू नये. याकरिता समाजातील कार्यकर्त्यांनी जनगणनेची घराघरात संपर्रक साधून नोंदणी करुन घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय महामंत्री नितीन नखाते, ईशा कोळेकर, राजेश फडकुले, रमेश रणदिवे, विद्याधर भूस, विजयकुमार लुंगाडे, मंत्री महावीर घोडके, सहमंत्री रुपेश वायकोस, वर्धमान नाकेल इत्यादी मान्यवरांसह राज्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected