बंधन प्रेमाचे
आईच्या कुशीत प्रेमाने
एकत्र मोठे आपण झालो
हसत खेळत कुटुंबात दोघ
सुखदुःख पाहत एकत्र वाढलो
माझ्या पाठिशी कायम तू
खंबीरपणे उभा राहतोस
सुखापेक्षा दुःखात लगेच
धावुन येत मदत करतोस
तुझ्यामुळे चांगले निर्णय
आयुष्यात मी घेत गेले
स्वतःच अस्तित्व निर्माण
करण्या पाठबळ तू दिले
भाऊ बहिणच प्रेमाच नात
बंधन बांधल मी हातावर
रक्षा तू सदैव करतो माझी
कायम हात माझ्या डोक्यावर
सैदव साथ देशील ना मला
तू पाठिराखा आहेस माझा
माझे आयुष्य तूला लाभो
आशीर्वाद लाभो मला तुझा
stay connected