Niraj Chopra यांची सुवर्ण कामगिरी..!
जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्य स्पर्धेत हंगेरीच्या बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये भारतील भालाफेकपट्टू नीरज चोप्रा यांनी ८८.१७ मीटर भालाफेक करत इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले ही बाब, सबंध भारतीयांना अभिमानास्पद असून या सुवर्ण कामगिरीने सर्व भारतीयांच्या माना अभिमानाने पुन्हा एकदा उंचावल्या असून नीरज चोपडा यांच्या या कामगिरीने सर्व भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत,हे नक्की.
आपल्या जिद्द,चिकाटी,आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर नीरज चोप्रा यांनी ऑलम्पिक मध्येही इतिहास रचला होता. ते प्रत्येक स्पर्धेत विक्रमी कामगिरी करून त्यांच्या नावे नवनवीन विक्रमाची नोंद करत सुवर्ण कामगिरी करताना ते दिसत आहेत.
नीरज चोप्रा यांनी जागतिक ॲथलेटिक स्पर्धेत ८८.१७ मीटर भालाफेक करत ऐतिहासिक कामगिरी सह सुवर्णपदक मिळवणारे नीरज चोप्रा पहिले आशियाई आणि पहिले भारतीय ॲथलेटिक ठरले असून या अतुलनीय केलेल्या कामगिरीमुळे आता क्रीडाप्रेमींच्याही आशा त्यांच्याकडून वाढल्या असून येणाऱ्या स्पर्धेत ते नक्की विक्रम करतील असा विश्वास भारतीयांच्या मना-मनामध्ये आहे.या स्पर्धेत भालाफेक करताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास जाणवत होता, सर्वांना विश्वास होता की, ते सुवर्ण मिळवतीलच व ते त्यांनी सत्यात उतरत भालाफेक करत भाला फेकताच विजय मुद्रा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
२०२२ च्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये नीरज चोप्रा यांनी रौप्य पदक पटकावून ते दुसरा भारतीय ठरण्याचा मान मिळवला होता, पण यावेळी थेट सुवर्णाला गवसणी घालत त्यांनी सर्व भारतीयांना सुवर्ण भेटच दिली. यावेळी त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास होता.नीरजने यांनी भारतीयांच्या विश्वास पुन्हा एकदा खरा ठरवला आणि पुन्हा एकदा त्याने स्वत:ला गोल्डन बॉय असं का म्हणतात हे सिद्ध करुन दाखवलंच.नीरज चोप्रा यांनी सुवर्ण पदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
नीरज चोपडा यांनी दुसऱ्या फेरीत ८८.१७ मीटर लांब भाला फेकून सुवर्णपदक आपल्या नावावर कोरले. त्यांचा पहिला प्रयत्न ठरल्याने पहिला फेरीत ते बाराव्या स्थानी राहिली स्पर्धेत इतक्या मागे पडूनही निराश न होता, आपल्या मेहनीतेवर व जिद्दीवर विश्वास ठेवत फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत दुसऱ्या प्रयत्नातच त्यांनी ८८.१७ मीटर भालाफेक करून विजयाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. या मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून ,क्रीडाप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे मी माझ्याकडून ही त्यांना येणाऱ्या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून असाच विक्रम घडो ह्या मनस्वी शुभेच्छा देतो.
- राहुल मोरे,
बीड.
मो.न.९४०४१८११८१
stay connected