राजमाता जिजाऊ विद्यार्थी वसतीगृहाचे रेंगाळले काम एक महिण्यात पुर्ण करणार- इंजि. तान्हाजी जंजिरे.

 राजमाता जिजाऊ विद्यार्थी वसतीगृहाचे रेंगाळले काम एक महिण्यात पुर्ण करणार-इंजि. तान्हाजी जंजिरे.




मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सिमेवर असलेला बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका आहे. या तालुक्याच्या तीन बाजुनी अहमदनगर जिल्ह्याची सरहद आहे. तरीही पूर्वी शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला तालुका म्हणून ओळखला जायचा. पुर्वी गावोगाव जि. प. च्या शाळा असायच्या. टाकळसिंग, धामणगांव,आष्टी, आष्टा (ह) येथे जि.प.चे हायस्कुल होते. खुंटेफळ, धानोरा, कडा, शिराळ, देवळाली येथे माजी आ. कै. भाऊसाहेब आजबे, कै. साहेबराव थोरवे (दादा), के. बांदल त्यांचे खाजगी हायस्कुल होते. कै. अँड. बी. डी. हंबर्डे यांचे एकमेव महाविद्यालय होते. मोजक्या शाळा असल्यामुळे आष्टी तालुक्यातील मुले अहमदनगर, औरंगाबाद, पुणे येथे शिक्षणासाठी जायचे. 1990 च्या दशकामध्ये मा. आ. भीमरावजी धोंडे यानी अनेक शाळा महाविद्यालये उभारली. 



आष्टी येथे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह कांही वर्षापुर्वी झाले. त्यानंतर भगवान महाविद्यालयाच्या आवारात प्रियदर्शनी मुलींचे वसतीगृह आहे. तसेच धोंडे साहेब यांच्या कृषी महाविद्यालय आवारात एक वसतीगृह आहे. आष्टी शहरांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसाय शिक्षण देणारे जसे महाविद्यालये आहेत तसेच इंजिनिअरींग, फार्मशी, नर्सिंग, कृषी, फुड टेक्नॉलॉजी आदी क्षेत्रातील महाविद्यालये आहेत. संपुर्ण महाराष्ट्र आणि परराज्यातून मुले - मुली येथे शिक्षणासाठी येतात. शहारातील अपुरे बांधकाम व पुरेशे वसतीगृह नसलेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. म्हणून आष्टी येथे विद्यार्थी वसतीगृहांची गरज होती व आहे. ज्यायोगे ग्रामीण भागातील गोर गरिब विद्यार्थ्याची राहणेची सोय होईल. म्हणून मराठा सेवा संघाच्या आष्टी तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यानी वसतीगृहाची गरज आदरणिय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांचेकडे कांही वर्षापूर्वी बोलून दाखवली. त्यास त्यानी सकारात्मक दृष्टी कोनातून होकार दिला.

त्यानंतर आष्टी-जामखेड रोडवर, सर्वज्ञ पेट्रोल पंपा जवळ, ब्रम्हगाव फाट्याच्या पुढे अर्धा एकर जागा 1996 साली खरेदी करण्यात आली. मूळ मालक माननीय एन डी पवार यांनी ही जागा अत्यंत माफक दरात सेवा संघास दिली.मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमजी खेडेकर, व अर्जुनराव तनपुरे तसेच आमदार सुरेश (आण्णा) धस यांच्या मार्गदर्शनाखाली सात-आठ वर्षापुर्वी वसतीगृहाचे काम सुरु करण्यात आले. त्यावेळेसचे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यानी लोकवर्गणी करून सदर काम सुरू केले. मराठा, बहुजन समाज बांधवांनी देणग्या देऊन मदत केली. आतापर्यंत सत्तर लक्ष रुपयाचे काम पूर्ण झाले. जवळजवळ 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाले. परंतु आर्थिक स्त्रोत कमी पडल्यामुळे सदरचे बांधकाम रेंगाळले होते. बांधकाम पुर्ण होत नाही याची खंत अशोक ठाकरे, लक्ष्मण रेडेकर, महेश शिंदे, बन्सीधर मोरे, इंजि. प्रल्हाद तळेकर, भास्करराव निंबाळकर, प्रा. डॉ. बाबासाहेब मुटकुळे, प्रा. डॉ. दत्तात्रय नरसाळे, प्रा. डॉ. जे. बी. टाळके, सुरेश पवार सर व ईतर कार्यकर्त्यांनी मा. खेडेकर साहेब व मा. तनपुरे साहेब यांचेजवळ बोलून दाखवली. घाटा (पिंप्री) येथील भागचंद झांजे यांचे घरी कांही महिण्यापुर्वी ते थांबले होते. त्यावेळी ही चर्चा झाली.

सविस्तर मुलाखत पहा👇📽️



दरम्यान आष्टी तालुक्यातील कुंबेफळ गावचे सुपुत्र इंजि. तान्हाजी एकनाथराव जंजीरे हे पुणे येथे स्थाईक आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील ते यशस्वी उद्योजक आहेत. त्यांना पहिल्यापासून सामाजिक कार्याची आवड आहे. त्यांचे वडील एकनाथ बुवा बाबुराव जंजिरे हे कुंभेफळ गावचे सलग पंधरा वर्षे सरपंच होते. त्यांनी 1962 ची विधानसभा निवडणूक आष्टी मतदार संघातून लढवली होती. माजी आमदार कै. भाऊसाहेब आजबे यांचे विरोधात फार थोड्या मताने त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्या वडिलाकडूनच तानाजी बापू यांना सामाजिक व राजकीय वारसा मिळाला आहे. माजी आमदार आदरणीय साहेबरावजी दरेकर (नाना) हे माझे गुरु त्यांचे मला नेहमीच मार्गदर्शन त्यांचे बरोबर मी दोन वर्षे काम 1990 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव त्यानंतर माझ्या आईच्या इच्छेनुसार व सांगण्यावरून मी आष्टी सोडले व पुणे येथे स्थायिक असे ते सांगतात.शासनाच्या वेगवेगळ्या विभागात त्यांनी ३३ वर्ष सल्लागार म्हणून काम केले. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे विभाग, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, स्मार्ट सिटी नाशिक इत्यादी विभागाचा समावेश आहे. आपली जन्मभूमी म्हणजे आष्टी तालुका यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा अशी त्यांची इच्छा आहे.१) आरोग्य २) शिक्षण३) वीज प्रश्न ४) पाणी ५) रस्ते या पंचसूत्रीला धरून ते सामाजिक काम करणार आहेत. त्यांच्या मूळ व्यवसायातून ते निवृत्त झाले असून, मुलगा प्रतिक त्यांचा संपुर्ण व्यवसाय सांभाळत आहे. मुलगी तेजश्री ही औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योगपती मधुकर (आण्णा) मुळे यांच्या घरची सून आहे. मा. अर्जुनराव तनपुरे साहेब हे जंजिरे बापू यांचे मित्र आहेत. आपल्या जन्मभुमीत म्हणजे आष्टी तालुक्यात सामाजिक काम करण्याची इच्छा जंजिरे बापू यानी त्यांच्याजवळ बोलून दाखवली. बोला फुलास गाठ पडल्याप्रमाणे तनपुरे साहेब यानाही आष्टीचे वसतीगृहाचे रेंगाळलेले काम पूर्ण करायचे होते म्हणून त्यांनी जंजीरे व मा. खेडेकर साहेबांची भेट घडवून आणली. झालेल्या चर्चेतून आष्टी तालुका मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदाची धुरा दोन माहिण्यापुर्वी इंजि. तान्हाजी बापू जंजिरे यांच्या खांदयावर सोपवण्यात आली. तेंव्हापासून राजामाता जिजाऊ वसतीगृहाच्या कामास गती मिळाली. इंजि. जंजीरे यानी पाथर्डी येथील पॉलीटेकनिक महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. पुणे येथे रहात होते तरी आष्टी तालुक्यातील नेतेमंडळी, राजकीय व सामाजिक कार्यकत्यांशी त्यांची चांगली नाळ जोडलेली होती. म्हणूनच त्याना मराठा सेवा संघ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, समाजकार्य करण्याची संधी मिळाली आहे. मा. खेडेकर साहेब, मा. तनपुरे साहेब, मा. धोगरे साहेब तसेच वृध्देश्वर साखर कारखान्याचे कार्यकारी सल्लागार मा. जे. आर. पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व इंजि. जंजिरे बापू यांच्या देखरेखीखाली वसतीगृहाचे बांधकाम अत्यंत वेगाने वेगाने सुरु आहे. या इमारती मधील दुसऱ्या मजल्यावरील आठ खोल्यांचे बांधकाम प्लास्टर करून पुर्ण झाले आहे. स्टेजच्या पाठीमागील बाजुक असलेला सेमिनार हॉलसुद्धा पूर्ण झाला आहे. त्यामधील किचन रूम व टॉयलेट बाथरूमसह बांधुन तयार आहेत. सेमिनार हॉलच्या समोर स्टेज आहे व स्टेजच्या समोर मोकळी जागा आहे. या ठिकाणी संघाचे केडर कॅम्प, वधुवर सुचक मेळावे, सामुदायिक विवाह, प्रबोधनपर मेळावे, सभा भरवण्यासाठी ही जागा आहे. भव्य दिव्य असे प्रवेशव्दार असून चोहोबाजूने संरक्षक भिंत आहे. या ईमारतीच छत, विटबांधकाम, प्लास्टरचे काम पूर्ण झाले आहे. भिंतींचे रंग काम, फरशी बसवणे, प्लंबिंग, लाईट फिटींग आदी कामे बाकी असून काम पुर्णत्वाकडे वाटचाल करित आहे.

हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी माजी अध्यक्ष सर्व शिवश्री रणजित जाधव, प्रा. देविदासराव चाळक, इंजि. राम नाथ, प्रा. ज्ञानेश्वर नवले, मा. रघुनाथराव आवारे, मुख्याध्यापक महेशकुमार शिंदे यांचे योगदान लाभले. वसतीगृहाचे कामकाज पाहणेसाठी पुर्ण वेळ व्यवस्थापकाची नाईट वॉचमनची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. हे काम लवकरात पुर्ण व्हावे यासाठी सर्व शिवश्री प्राचार्य शशिकांत कन्हेरे, अँड. सीताराम पोकळे, बन्सीधर बापू मोरे, लक्ष्मण रेडेकर सर, भास्करराव निबाळकर, इंजि. प्रल्हाद तळेकर आप्पा, प्रा. डॉ. बाबासाहेब मुटकुळे, प्रा. डॉ. दत्तात्र्यय नरसाळे, प्रा. डॉ. आप्पासाहेब टाळके, मुकुंद लगड, लालासाहेब वीर, रमेश पाचे, शिवाजीराव पाचे, भाऊसाहेब गाडे, सुरेश पवार सर, चंद्रशेखर खाडे, अँड. एस्. एस्. कदम, प्राचार्य विठ्ठल गुंड, कर्डिले जी. एस्., अँड. रमेश जंजीरे, अविनाश जगताप, शरद केरूळकर, राघव केरूळकर, शिवमती सुवर्णाताई गिऱ्हे आदी मान्यवर परिश्रम घेत आहेत. मराठा सेवा संघाचे वर्धापण दिनी 1 सप्टे. २०२३ रोजी वसतीगृह ईमारतीचे उ‌द्घाटन मा. खेडेकर साहेब यांचे शुभहस्ते व मा. तनपुरे साहेब व घोगरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष इंजि. तान्हाजी (बापू) जंजिरे यानी सांगितले.

पुणे येथे स्थायिक होण्यापूर्वी 1990 च्या सुमारास जंजिरे बापू आष्टी येथे दरेकर नाना बरोबर काम करीत त्यावेळी त्यांचे व माझी मैत्री झाली . मी पुण्यात येथे गेल्यानंतर त्यांच्याकडून माझा आदर्श ठेवत असे व पावन चारही होत माझा मोठा मुलगा सागर हा पुणे येथे शिक्षण घेत असताना त्यांचे सागरला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.अशा या कष्टाळु , हुशार , अभ्यासू,सामाजिक कार्यकर्त्यास वाढदिवसानिमित्त मनपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा.


अँड. सीताराम पोकळे,पत्रकार
मो.नं. 9421638055







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.