Bhimrao Dhonde Birthday : मानव सेवा हीच ईश्वर सेवा
महाराष्ट्रातील बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. बीड जिल्हा हा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा बालेकिल्ला मानला जातो.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे परममित्र भीमराव धोंडे . मराठवाड्याच्या मातीत जन्मलेले, शांत, संयमी, कुशल राजकारणी व सतत दिन दलित, शेतकरी, शेतमजूर, कामगार, ऊसतोड कामगारांसाठी आंदोलने करणारे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील शेतकऱ्यांचे नेते म्हणजेच भीमराव जी धोंडे होय.महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक विचारांचा प्रभाव भीमराव जी धोंडे यांच्यावर पडल्यामुळेच त्यांनी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील दिन दलित, गरीब, शेतकरी, शेतमजुर, ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींना शिक्षण मिळावे म्हणून शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. मराठवाड्यातील बीड जिल्हा हा शैक्षणिक दृष्टिकोनातून अतिशय मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जात होता अशावेळी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विघालय स्थापना करून ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मुला मुलींना शिक्षण घेण्याची संधी प्राप्त करून दिली. आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात वरिष्ठ महाविद्यालय स्थापन करून उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळून दिली.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता व आवडीनिवडीनुसार त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी डीएड, बीएड महाविद्यालय, डी फार्मसी, बी फार्मसी, कृषी महाविद्यालय, फूड टेक्नॉलॉजी कॉलेज, नसिग कॉलेजची स्थापना करून ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षण घेण्याची संधी मिळून दिली.
महाराष्ट्रातील बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. बीड जिल्हा हा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा बालेकिल्ला मानला जातो.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे परममित्र भीमराव धोंडे . मराठवाड्याच्या मातीत जन्मलेले, शांत, संयमी, कुशल राजकारणी व सतत दिन दलित, शेतकरी, शेतमजूर, कामगार, ऊसतोड कामगारांसाठी आंदोलने करणारे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील शेतकऱ्यांचे नेते म्हणजेच भीमराव जी धोंडे होय.
भीमरावजी धोंडे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, शांत ,संयमी, मुरब्बी राजकारणी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. समाजसेवा करत करत राजकारण करणे हा त्यांचा पिंड आहे. सत्ता असो किंवा नसो समाज सेवेला ते नेहमीच प्राधान्य देतात. कोरोनाच्या कालखंडात हजारो दिन दलित, गोरगरीब, शेतमजुर रुग्णांची ते प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना औषधोपचार व मानसिक आधार देण्याचे काम भीमरावजी धोंडे यांनी केले होते. रुग्णांच्या जेवणाची सोय सुद्धा त्यांनी मोफत केली होती. झोपडपट्टीतील गोरगरीब , शेतकरी, कामगारांच्या घरापर्यंत मोफत किराणामाल पोहोचविण्याचे महान कार्य भीमरावजी धोंडे यांनी कोरोनाच्या कालखंडात केले होते. मानव सेवा हीच ईश्वर सेवा असे ते मानतात.
शेतकरी शिक्षण संस्था ही एक महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. शेतकरी शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून ते आज पर्यंत हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण घेऊन महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, तहसीलदार, उद्योगपती, कलाकार, डॉक्टर, प्राध्यापक, वकील, शिक्षक, कलावंत, कवी, लेखक, व्यापारी म्हणून काम करताना दिसतात.
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील दुष्काळग्रस्त शेतकरी शेतमजुरांच्या मुला मुलींना उच्च शिक्षण घेऊन आपल्या शेतकरी शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली.हजारो सुशिक्षित युवक युवतींना नोकरी करण्याची संधी मिळाल्यामुळे बेरोजगारीवर मात करता आली. हजारो दिन दलित ,गरीब, शेतकरी, शेतमजूराची मुलं मुली प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कारकून, शिपाई इत्यादी पदावर नोकरी करू लागली त्यामुळेच गरिबांच्या घरच्या चुली पेटल्या.
शुभेच्छा जाहिरात पहा👇📽️
कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने प्रभावित होऊन भीमरावजी धोंडे यांनी दिन दलित, गरीब, शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठी वसतिगृहाची सोय करून दिली.
भीमरावजी धोंडे यांना नवनवीन पुस्तके वाचण्याचा खूप छंद आहे. वेळ मिळेल तेव्हा ते आपला वेळ पुस्तक वाचण्यात घालवितात. विद्यार्थ्यांनी नवनवीन पुस्तकाचे लेखन करावे, कविता लिहावी, नवनवीन कथाकार निर्माण व्हावेत यासाठी ते विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. नवनवीन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. भीमरावजी धोंडे यांना कुस्ती विषयी अतिशय प्रेम आहे. आष्टी येथील प्रसिद्ध मल्ल अली पैलवान हे त्यांचे परममित्र. सईद चाऊस यांना महाराष्ट्र केसरी बनविण्यात भिमरावजी धोंडे यांचा सिंहाचा वाटा आहे.
गंगाई बाबाजी महोत्सवाचे आयोजन करून नवनवीन साहित्यिक, विचारवंत, कलाकार, कलावंत यांना भगवान महाविद्यालयामध्ये निमंत्रित करून त्यांचे विचार व कला सादर करण्याची संधी प्राप्त करून देतात. महाराष्ट्राची लोककला म्हणजे लावणी होय. लावणी महोत्सवाचे आयोजन करून शहरी व ग्रामीण भागातील नवनवीन कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळवून दिली जाते. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील गंगाई बाबाजी महोत्सव हा आष्टीकरांसाठी मनोरंजनाची मेजवानी मेजवानी मानली जाते
भीमरावजी धोंडे हे साहित्य व कलाप्रेमी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहे. शेतकरी शिक्षण संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व नवलेखक, कवीं यांना नवनवीन साहित्य निर्मितीसाठी ते नेहमीच प्रोत्साहन देत असतात.
भीमरावजी धोंडे हे बीड जिल्ह्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. दिन दलित, गरीब, शेतकऱ्यांसाठी सतत आंदोलन करणारे, साहित्यप्रेमी व कलाप्रेमी व्यक्तिमत्व, प्रसिद्ध शिक्षण महर्षी, चित्रपट निर्माते, कलाकार, कुशल राजकारणी, शेतकऱ्यांचे नेते म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत अशा या थोर समाज सुधारकास वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.



%20shivshree%20tanaji%20janjere%20final.jpg)




stay connected