मोंढारोड पुलावर जीव गेल्यावरच मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या डोक्यात प्रकाश पडणार का ?? लोखंडी गज उघडे पडले ,संरक्षक कठडे गायब, अपघाताचा धोका :- डॉ.गणेश ढवळे
---
बीड:- बीड शहरातील मोंढा रोडवरील अमरधाम स्मशानभूमी ते शिवशारदा बिल्डिंग जालना रोड पर्यंत रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असुन रस्त्यावरील जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडले असुन त्यातच भर म्हणून पुलावरील सिमेंट रस्त्यावरील लोखंडी गज उघडे पडले असुन खड्डे पावसाने भरल्याने वाहन चालकांना अंदाज येत नसुन उघड्या पडलेल्या लोखंडी गजामुळे टायर फुटुन अपघाताची दाट शक्यता असुन पुलाचे संरक्षक कठडे सुद्धा तुटलेले आहेत मात्र मुख्याधिकारी नगरपरीषद बीड नीता अंधारे रस्त्याची दुरूस्ती महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत काम प्रस्तावित असल्याचे सांगून वेळ मारून नेत असुन याठिकाणी लोकांचे जीव गेल्यावरच दुरुस्ती करणार का असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.संबधित प्रकरणी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी नगरपरीषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना लेखी निवेदनाद्वारे तक्रार करून आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
मुख्याधिकारी नीता अंधारे यांना गांभीर्य नाही , नेहमीप्रमाणेच जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
---
stay connected