आष्टी पोलिसांची ताडी केंद्रावर कारवाई


आष्टी पोलिसांची ताडी केंद्रावर कारवाई




आष्टी - येथील फुलेनगर येथे ताडी केंद्रावर ताडी नष्ट करताना आष्टी पोलीस

आष्टी ता.२४ ( शेख निसार )-शहरातील फुलेनगर येथे घरामध्ये विनापरवाना ताडी बनवत असल्याची माहिती आष्टी पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी सहकाऱ्यांना सोबत टाकलेल्या छाप्यात तीनशे लिटर ताडी व त्यासाठी लागणारे साहित्य जप्त करून नष्ट केले. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी येथील फुलेनगर येथील चांगदेव मारुती वाल्हेकर हा आपल्या राहत्या घरामध्ये विनापरवाना ताडी तयार करून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना समजताच बुधवारी (ता.२३) सदरील ठिकाणी सापळा छापा टाकला. यावेळी दोन निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या टाकीमध्ये रसायन मिश्रित तयार केलेली १५ हजार रुपयांची ३०० लिटर ताडी  तसेच त्यासाठी लागणारे साहित्य पंचासमक्ष ताब्यात घेऊन पंचनामा करून सदर ठिकाणी नष्ट करण्यात आले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विलास गुंडाळे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव धनवडे हे करत आहेत. सदरील कारवाई पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे, नामदेव धनवडे, पोलिस कॉन्स्टेबल बब्रुवान वाणी, प्रविण क्षिरसागर,विलास गुंडाळे यांनी केली आहे. संतोष खेतामाळस यांनी आष्टी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर आष्टी ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गावात अवैध धंदे करणाऱ्यावर कारवाईचा धडाका लावला आहे. यामुळे अवैध धंदे करणाऱ्यात खळबळ उडाली आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.