केज तालुका मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
केज (प्रतिनिधी) :- मराठी पत्रकार परिषदेचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष विजयराज आरकडे आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक सुहास चिद्र वार व समन्वयक दशरथ चवरे यांचा केज तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मराठी पत्रकार परिषदेच्या केज तालुकाध्यक्षपदी विजयराज आरकडे आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या केज तालुका निमंत्रकपदी सुहास चिद्रवार तर केज तालुका पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या समन्वयकपदी दशरथ चवरे यांची निवड झाली आहे. त्या निमित्त केज येथील केज तालुका पत्रकार संघाच्या वतीने दि. २३ ऑगस्ट रोजी त्यांचा केज येथील शासकीय विश्राम गृहावर सत्कार आयोजित केला होता. या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष गौतम बचुटे, कार्यक्रमाचे संयोजक अशोक सोनवणे, डी डी बनसोडे, रामदास तपसे आणि विनोद शिंदे यांच्यासह पत्रकार संतोष गालफाडे, अजय भांगे, प्रकाश मुंडे, महादेव गायकवाड, दत्तात्रय मुजमुले, बशीर खतीब, महादेव काळे, बाळासाहेब जाधव, नंदकुमार मोरे, महादेव दळवी हे उपस्थित होते.
या प्रसंगी डी डी बन्सोडे, रामदास तपसे, गौतम बचुटे आणि अजय भांगे यानी नवमीर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


stay connected