राजकारणातील मोठी बातमी, पुण्यात शरद पवार व अजित पवारांची गुप्त भेट…
राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील एका बड्या व्यावसायिकाच्या घरी ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
पुण्याच्या चांदणी चौकातील प्रकल्पाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. त्यानंतर अजित पवार हे कोरेगाव पार्कमधील चोरडिया यांच्या बंगल्यावर गेले. अजित पवार यांनी याच वेळी शरद पवारांची भेट घेतल्याचं समोर येत आहे. यावळी अजित पवार यांनी त्यांची सिक्युरिटी घेतली नव्हती, ती सर्किट हाऊसकडे रवाना झाली.
कोरेगाव पार्कमधून अजित पवारांची नेहमीची गाडी बाहेर पडली पण ती रिकामी होती. चोरडिया यांच्या बंगल्यावरून बाहेर पडताना अजित पवार हे दुसऱ्याच एका गाडीमध्ये बसल्याचं दिसून आलं.
या भेटीतुन नेमके कोणते राजकिय समिकरण पुढे येणार याबाबत राजकिय विश्लेषकांमध्ये अनेक चर्चा होताना दिसत आहेत .


stay connected