ॠषिकेश दरेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक तालुकाध्यक्ष पदी निवड..!
-----------------
संदिप जाधव/आष्टी
माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांचे नातू व राजाभाऊ दरेकर यांचे चिरंजीव ॠषिकेश दरेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख यांनी ॠषिकेश दरेकर यांची नियुक्ती केली आहे.
आष्टी तालुक्यातील धानोरा येथील कामधेनू मंगलकार्यालयात दि .१२ ऑगस्ट रोजी बैठक संपन्न झाली.
गुरूवारी होणार्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभेच्या पुर्वतयारीसाठी बैठक संपन्न झाली होती.
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही निवड केली आहे.
सध्या राष्ट्रवादी मध्ये झालेली फुट,विस्कटलेली घडी पुन्हा व्यवस्थित करण्याचे काम सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे.
त्याच अनुषंगाने ही बैठक आयोजित केली होती.
आता राष्ट्रवादीला आष्टी तालुक्यामध्ये माजी आमदार साहेबराव दरेकर सारखे अनुभवी व खमके नेतृत्व मिळाले आहे.आणि त्यांच्या माध्यमातून आता पुन्हा राष्ट्रवादी प्रबळ होणार असल्याचे बोलले जात आहे.
आणि त्याच खमक्या नेतृत्वाचे नातू ॠषिकेश दरेकर पुढे आले आहेत.
यामुळे आता नविन युवकांची फळीही ॠषिकेशच्या माध्यमातून आपल्याला दिसणार आहे.
तेजवार्ता न्युजशी संवाद साधताना ॠषिकेश म्हणाले की, येणाऱ्या काळात मी युवकांची मोठी पळी निर्माण करणार व माझे आजोबा दरेकर नानांच्या माध्यमातून मी राष्ट्रवादीचे चांगल्या प्रकारे काम करणार अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
त्याच्या निवडीबद्दल त्यांचे बीडचे आमदार तथा राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष संदिपभैया क्षिरसागर,युवा प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख, साहेबराव दरेकर नाना, परमेश्वर काका शेळके, बापूसाहेब डोके,माजी आमदार सय्यद सलीम,रविकाका ढोबळे, बाळासाहेब मिसाळ, रामभाऊ खाडे, माजी सरपंच केशव चव्हाण,युवा नेते सागर दरेकर, सह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.




stay connected