कड्याच्या आठवडी बाजारात छोटा व्यावसायिक कोलमडला..!

 कड्याच्या आठवडी बाजारात छोटा व्यावसायिक कोलमडला..!

------------------ 




संदिप जाधव/आष्टी 

ग्रामीण अर्थव्यवस्थेत आर्थिक व्यावहाराचे सर्वात मोठे ठिकाण आठवडी बाजार आहे. यामध्ये शेतमाल, कारागिरी, कलाकुसर, जोडव्यावसाय, पाळीव प्राणी पक्षी, खाद्यन्न, कपडे, यांची खरेदी विक्री होते. तसेच आठ दिवसात जो व्यवहार झालेला आहे त्याची देवाण-घेवाण होते. परंतु सध्या काही ठिकाणी खुपच कमी पाऊस आहे.त्यामध्येच आष्टी तालुक्यामध्येही फार कमी प्रमाणात पाऊस असल्याने ग्रामीण भागात अर्थव्यवस्था कोलमडते की काय अशी परिस्थीती निर्माण झालेली आहे.

हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आघात ग्रामीण अर्थ व समाजव्यावस्थेवर झालेला दिसून येत आहे.

कडा शहराचा बाजार पाहीला तर गुरांचा बाजार हा सर्वात मोठा असायचा परंतु आता त्या काळासारखा बाजार राहीला नाही.

पूर्वि कड्याच्या बाजाराला तालुक्यातील,वाड्यावस्तीवरील खेडेगावातील अनेक बाजारकरू बाजार करण्यासाठी येत होते.

परंतु मध्यांतरीच्या काळात कोरोणा सारखा आजार आला.त्या आजाराने सर्व जगभर थैमान घातले होते.

आणि लॉकडाऊन सारखे नियम लागू झाल्याने प्रत्येक गावात छोटे छोटे बाजार भरवायला सुरूवात झाली.

त्यामध्येच वेळेवर न येणार्‍या पावसाने छोट्या छोट्या व्यवसायावर गदा आली.

आणि त्यामध्येच आज आपल्याला छोटा व्यापारी, गरीब शेतकरी, कष्टकरी कामगार मजूरांची मोठी हानी होताना दिसत आहे.


कड्याच्या बाजारात जवळपास पन्नास टक्यांची घसरण झाली आहे.

पावसाच्या हभावामुळे हा शेतकऱ्यांना खुप मोठा फटका बसला असल्याचे मत शेरी बुद्रुक येथील शेतकरी विष्णू जाधव यांनी सांगीतले.






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.