अशोक फाउंडेशनच्या वतीने मा आमदार पप्पु कलानी यांच्या उपस्थितीत शिवाजी रगडे यांच्या प्रयत्नाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा
उल्हासनगर दि :- समाजातील एक महत्त्वाचा भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांना ओळखले जाते परंतु काही कारणास्तव त्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या कुटुंबापासून वेगळे राहावे लागते त्यांना माणुसकीच्या दृष्टिने आपले कर्तव्य समजुन अशोका फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी आजचा दिवस साजरा केला.
सदर कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, रक्त तपासणी व औषध वाटप शिबिराच आयोजन केले होते त्याच बरोबर त्यांना फळ वाटप व तसेच ज्येष्ठ महिलांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमांमध्ये उल्हासनगरचे माजी आमदार माननीय पप्पू कलानी साहेब नगरसेविका सविताताई रगडे, नगरसेवक गजानन शेळके, शिवाजी रगडे, फिरोज खान, सीमा महेश आहुजा, शालिनीताई गायकवाड, भरत शिवणानी, प्रमोद घनहादूर, सुनील खांडेकर, समाधान वाघ, माँटी राजपूत,तोफीक शेख, सिराज खान, प्रविण घनबहादुर, अनिल रौराळे, रुपेश ढोके, शुभम रगडे तसेच अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रम पाहून ज्येष्ठ नागरिक अत्यंत भावनिक झाले तसेच शिवाजी रगडे यांनी दरवर्षी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या दिवशी त्यांना भेट देण्याचे देखील वचन दिले.


stay connected