सौंदर्य दिसण्यात नसून असण्यात असतं-डॉ.जीतीन वंजारे

 सौंदर्य दिसण्यात नसून असण्यात असतं-डॉ.जीतीन वंजारे

Beautiful


         सौंदर्य हे नैसर्गिक असतं त्याला रंग रूप आणि आकार या परिसीमा नसतात. सौंदर्य हे काळा पांढरा गोरा भोरा यावर डीपेंड नसतं तस म्हणाल तर रात्र अती काळी आणि भयानक असते पण तीच उद्याच सुंदर स्वप्न उद्याचा नवा अंकुर उद्याची नवी सुरुवात आणि रात्रीचा मदमस्त आरामही तीच देते मग ती वाईट कशी ? वाईट असतो तो आपला दृष्टीकोन.....! दिवस गोरा पांढरा आणि शुभ्र प्रकाशवंत असला तरी त्यात दूनियाची पळापळ,असंतुलित ताण तणाव आणि जीवन मरणाची घाई गडबड असते पण आपण दिवसाला  रात्रीपेक्षा जास्त महत्त्व देऊन काळा पांढरा, रंग, रूप,आकार यासारख्या भौतिक गोष्टीचा संदर्भ देऊन विद्रुपीकरण करतो आहोत. नैसर्गिक सौंदर्य म्हणजे युनिकनेस, स्वतंत्र्य अस्तित्व प्राप्त असलेली गोष्ट जी एक अनमोल अविस्मरणीय आणि अकल्पनीय असते.तिला जोड नसतो . रंग रूप आकार हे नजरेचे दोष असून आहे तस स्वीकारून जीवन जगण्यातच खरा जीवनाचा आनंद आहे. अनुकूलन हे स्वतात असल पाहिजे समोरच्याला असा हो तसा हो म्हणून जीवनाची अपेक्षावादी आणि त्यामुळे निराशावादी वाट लाऊन घेणे योग्य नाही .त्यामुळे चित्रात दिलेल्या दोन्ही मुली अतिशय सुंदर असून फक्त रंगाने वेगवेगळ्या असू शकतात.बाकी आपोआपला विषय आणि दृष्टीकोन.....!*

डॉ .जितीन वंजारे





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.