शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेवर बंदी घालून संभाजी भिडे यांना अटक करा:बहुजन समाजाची मागणी

 शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेवर बंदी घालून संभाजी भिडे यांना अटक करा:बहुजन समाजाची मागणी





राष्ट्रपिता महात्मा गांधी व महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह महापुरुषाबद्दल आक्षेपार्य व वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा भिडे हे वारंवार वादग्रस्त विधान करून बहुजन समाजाच्या भावना दुखवत आहेत त्यांच्या  अशा वक्तव्यामुळे जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण होत आहे समाजा समाजामध्ये दुफळी निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे तरी असे वादग्रस्त विधान करणाऱ्या भिडे यांना तात्काळ अटक करा अन्यथा बहुजन समाजाच्या वतीने आंदोलने केली जातील असा इशारा बहुजन समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला. अशा आशयाचे निवेदन मिरज प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार नारायण मोरे  यांनी स्वीकारले.

 निवेदन देताना सूर्यकांत कुकडे,डॉक्टर नंदकिशोर सुतार,एडवोकेट  वृषभनाथ अथने,जैलाब शेख, चंद्रकांत जाधव,विजय बल्लारि डॉक्टर पैगंबर मुलानी,जमीर शेख,डॉक्टर ईश्वर कोरे,शब्बीर आत्तार,रफिक शेख व साद गवंडी आदीसह बहुजन समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.