राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर Essay writing Competition

 राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा  निकाल जाहीर Essay writing Competition 



( प्रतिनिधी आशा रणखांबे ) 


उल्हासनगर  / ठाणे 


       श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच, उल्हासनगर, जि. ठाणे  यांच्या संयुक्त विद्यमाने  राजर्षी  छत्रपती शाहू महाराज  यांच्या  १४९ व्या जयंती निमित्ताने संस्थेच्या माध्यमातून  राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे  आयोजन नुकतेच करण्यात आले होते. राज्यभरातून निबंध स्पर्धेला प्रतिसाद चांगला मिळाला असून  या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून  कार्यभार  डॉ. सुमेध पारधे,  साहित्यिक  नवनाथ आनंदा  रणखांबे, अ‍ॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे आणि इंजि. गौतम विजय बस्ते यांनी  पाहिले. निबंध स्पर्धा विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे

प्रथम क्रमांक प्रियांका जगदेवे आणि मयुर तायडे, द्वितीय क्रमांक स्नेहा पाटील आणि  अ‍ॅड. रुपाली कापडेकर, तृतीय क्रमांक विदया पाटोले, प्रोत्साहन पारितोषिक - अरूण  आलेराव आणि पल्लवी कांबळे.  पारितोषिके खालीलप्रमाणे वाटप-  प्रथम पारितोषिक : २०००/-  + सर्टिफिकेट (दोघ विजेत्यांमध्ये समान वाटप) , द्वितीय पारितोषिक : १०००/- (दोघ विजेत्यांमध्ये समान वाटप)+ सर्टिफिकेट , तृतीय  पारितोषिक : ५००/- + सर्टिफिकेट . ३ उत्तेजनार्थ पारितोषिक  ३०० /- + सर्टिफिकेट सर्व स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे सर्व परीक्षक, श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच, उल्हासनगर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी  निबंध स्पर्धेतील सर्व  विजेत्यांचे आणि सहभागी स्पर्धकांचे  अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.