ठाण्यातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा -ठाणे शहर काॅग्रेसची मागणी.
ठाणे :- (रमेश कांबळे) ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयाच्या आवारामध्ये एन सी सी च्या विद्यार्थ्यांना एक तरुण बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाला असल्याने आज काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व एन.एस्.यु.आय् या विद्यार्थ्यी सघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन आज जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्य सुचित्रा नाईक यांना पत्राद्वारे संबंधितावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण याच्या मार्गदर्शनाखाली व शहर काॅग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सबधिताची भेट घेऊन निवेदन देण्यात आले याप्रसंगी महिला अध्यक्ष वैशाली भोसले,एन एस यु आय अध्यक्ष प्रथमेश यादव,महेंद्र म्हात्रे गिरीश कोळी,राजू शेट्टी आनंद सागळे,राजू हैबती,किशोर काबळे,शिरीष घरत, सुभाष ठोम्बरे आदीपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.


stay connected