हंबर्डे महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबिर संपन्न.....

 हंबर्डे महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबिर संपन्न.....



आष्टी: येथील अॅड. बी.  डी.  हंबर्डे महाविद्यालय आष्टी व तहसिल कार्यालय आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 02 ऑगस्ट 2023 रोजी लोकप्रशासन व राज्यशास्त्र विभाग यांच्यावतीने ‘नवीन मतदार नोंदणी शिबिराचे’ आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आष्टी येथील तहसीलदार मा. प्रमोद गायकवाड, नायब तहसीलदार मा. विनायक धावणे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रम संस्था अध्यक्ष मा.किशोर (नाना) हंबर्डे, सचिव अतुलशेठ मेहेर यांच्या प्रेरणेने संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.आर. निंबोरे उपस्थित होते. सध्या तहसील कार्यालय, आष्टी यांच्यावतीने दि. 01 ऑगस्ट ते 07 ऑगस्ट 2023 दरम्यान ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. त्याचे औचित्य साधून  तहसिल कार्यालयाच्या सहकार्यातून महविद्यालयाने पुढाकार घेवुन 18 वर्ष वय पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे नवीन मतदार नोंदणी फॉर्म भरून घेतले. तसेच तहसील कार्यालयात आष्टी यांच्यावतीने विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सदर  कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ.भगवान वाघमारे, सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. रमेश भारुडकर, तर आभार डॉ. मंगेश शिरसाठ यांनी मानले. यावेळी महसूल सहाय्यक शिवप्रसाद गारोळे, निवडणूक ऑपरेटर विशाल मोकशे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. रवी सातभाई, प्रा. एस. जी. गोपणे, प्रभारी प्राध्यापक डॉ. डी.पी. मुंढे, प्रा. रामेश्वर आगलावे, श्रीमती प्रा. डी. डी. मस्के तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.