शेतकऱ्यांच्या बँक खात्याला केवायसी ची अट रद्द करण्यात यावी : रवी काका ढोबळे

 शेतकऱ्यांच्या बँक खात्याला केवायसी ची अट रद्द करण्यात यावी : रवी काका ढोबळे 




कडा/प्रतिनिधी .


आष्टी तालुक्यामध्ये गेल्यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला व अतिवृष्टी सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली  त्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले .

शासनाने याची दखल अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करून खात्यावर जमा करण्यासाठी बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांची खाते आहेत त्यांनी केवायसी काढून घ्यावी अशी अट प्रत्येक खातेदारांना शिथिल केल्यामुळे शेतकरी वर्ग या अनुदानापासून वंचित राहणार आहे .

कारण काही शेतकरी मयत झाले असून त्यांची केवायसी झाली नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही व त्यांच्या वारसाला त्या पैशापासून वंचित राहावे लागणार आहे तरी शासनाने केवायसी काढण्याची अट रद्द करून .

सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई चे अनुदान जमा करावी व जे शेतकरी मयत आहेत त्यांच्या वारसांना त्यांच्या खात्यावरील रक्कम देण्यात  यावी व ही केवायसी ची रद्द करावी .

शासनाने असे जर नाही केले तर शेतकऱ्यांना संघटित करून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची तालुकाध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी केली आहे .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.