अंध दिव्यांग बंधू-भगिनींनी उल्हास नदीच्या काठावर फडकवला 2 किमी लांबीचा तिरंगा.
उल्हासनगर दि :- उल्हासनगर म्हारळगाव रिजन्सी अँटिलिया बिल्डिंग कॉम्प्लेक्समध्ये 2 किलोमीटर लांबीची ऐतिहासिक रेकॉर्ड असलेली तिरंगा यात्रा काढण्यात आली.
यावेळीउल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुमार आयलानी आणि उद्योगपती महेश अग्रवाल उपस्थित होते.
रिजन्सी अँटिलिया बिल्डिंग कॉम्प्लेक्स, रिजन्सी चे ग्रुप महेश अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते आशिष यादव, उल्हास नदी बचाओ कृती समिती, उल्हासनगर अंध संघटना, महामाया असंघटित महिला कामगार संघटना, उल्हासनगर कब्रस्तान समिती, हिंदी भाषिक संघटना, दशमेश पिता तरुण शीख लबाना संघटना, पत्रकार बांधव, सेना जवान यांच्या सहकार्याने, 100 अंध अपंग बंधू-भगिनींसह श्यामला सेवा प्रतिष्ठान, सिमरन सखी संस्था व इतर सामाजिक संस्था, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे, आप, आरपीआय, आरकेपी यासह सर्व राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. 2017 पासून अखंडपणे सुरू असलेल्या या 12 व्या तिरंगा यात्रेची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड बुकमध्ये नोंद करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.


stay connected