कडा येथे गुरुदत्त मेडिकलचे आ. सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन
कडा/ प्रतिनिधी..
आजच्या धावपळीच्या जीवनात रोगांची वाढती संख्या आणि त्यावर उपयुक्त असणारी अनेक औषधे किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांचा जीव आर्थिक ओढाताणीत मेटाकुटीस आलेला दिसतो. अशा परिस्थितीत कडा येथे छत्रपती संभाजी महाराज चौकात गुरुदत्त मेडिकल मुळे परिसरातील सर्व सामान्यांना मोठाच दिलासा मिळणार असल्याचे आ. सुरेश धस यांनी उदघाटन प्रसंगी आपले मत व्यक्त केले यासाठीच सध्याच्या काळात अनेक ठिकठिकाणी मेडिकल स्टोअर्स आहेत परंतु माजी उपसरपंच राजाबापू कर्डिले यांनी आयुष्यभर खडतर संघर्ष करत आपले दोन्ही मुलं उच्चशिक्षित करून एक मुलगा डॉक्टर व एक मुलगा अजय हा मेडिकल
क्षेत्रात कार्य करतील असे हि आ. सुरेश धस म्हणाले. याप्रसंगी मदन महाराज मठाचे मठाधिपती ह.भ.प बबन महाराज बहिरवाल
यांनी शुभाशिर्वाद दिले या उदघाटन प्रसंगी सभापती रमजान तांबोळी, सरपंच युवराज पाटील, माजी सरपंच अनिल ढोबळे, रामशेठ मधुरकर, मा. उपसरपंच संभाजी कर्डिले, उपसरपंच बाळासाहेब कर्डिले, ग्रा.प. सदस्य
दिपक कर्डिले, श्रीरंग कर्डिले, नागेश कर्डिले, सुखदेव कर्डिले, बबलू पानसरे, राम कर्डिले, अनिल शिंदे, डॉ. पटवा, डॉ. माधवराव चौधरी, डॉ. अक्षय | कर्डिले, उमेश पांडुळे, किरण काळे, सागर कर्डिले यांच्या सह | सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवर उपस्थित होते. समारंभात मान्यवरांचा शाल- श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कडा शहरात हे औषधांचे 'पहिलेच मेडिकल असेल की, सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांना परवडतील अशा दरांत औषधे उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन देऊन उपस्थिताचे ग्रा. पं सदस्य दिपक कर्डिले सर यांनी आभार मानले
stay connected