कडा परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करा.. रवी काका ढोबळे.
कडा / अनिल मोरे
प्रतिनिधी.
आष्टी तालुक्यातील कडा शहरामध्ये गेली १५ दिवसापूर्वी पासुन विद्युत पुरवठा सुरळीत सुरू नाही .सदरील विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते.
कडा परिसरात अनेक शेतकरी वर्ग आहे शेतकऱ्यांना शेती साठी रात्री शेतीची कामे करण्यासाठी जावे लागते परंतु विद्युत पुरवठा सुरळीत सुरू नसल्याने सर्प तसेच इतर उपद्रवी प्राण्यापासून धोका निर्माण होऊ शकतो.
तरी कडा परिसरातील गेल्या १५ दिवसापासून सुरू असलेला विद्युत पुरवठ्याचा लपंडाव तात्काळ थांबवा व विद्युत पुरवठा अखडीत सुरू करावा नसता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी दिली आहे.
stay connected