सरस्वती माध्य. व उच्च माध्य. विद्यालयत रक्षाबंधन उत्साहात साजरा
गुरुवार दिनांक ३१/०८/२०२३ रोजी आकुर्डी येथील “नवनगर शिक्षण मंडळाच्या सरस्वती माध्य. व उच्च माध्य. विद्यालयतील इयत्ता ५ वी ते १० वी च्या *गाईड पथकाच्या* वतीने *रक्षाबंधनचे* औचित्य साधून *निगडी पोलिस ठाणे येथील बंधू भगिनींना राखी* बांधण्याच्या कार्यक्रमाचे नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक मा. प्रा.श्री. गोविंदराव दाभाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलेले होते.
या प्रसंगी निगडी पोलिस ठाणे मधील सर्व बंधू व भगिनी तसेच सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे गाईडर *सौ.प्रतिमा काळे,सौ.जयश्री घावटे,सौ.देवरे मॅडम* उपस्थित होते.या प्रसंगी मा.उज्ज्वला पाटील मॅडम यांना सौ.प्रतिमा काळे यांचा " *मी प्रतिमा माझी प्रतिमा*" हा काव्यसंग्रह सप्रेम भेट देण्यात आला.मुलींना पोलिस ठाण्यातून खाऊ वाटप करण्यात आला.
stay connected