संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा.. राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते गणेश पांडुळे..
कडा/ प्रतिनिधी.( अनिल मोरे )
सध्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सुरुवातीपासून पाऊस कमी प्रमाणात होत गेला शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरणी केली परंतु संपूर्ण पिके वायाला गेली असून शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास पावसाने हिरकावून घेतला .
सध्या पावसाचा 25 दिवसाचा खंड पडल्याने यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रभर दुष्काळ पडण्याची चिन्हे दिसत आहे त्यामुळे शासनाने संपूर्ण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मंडलाधिकारी तलाठी यांनी शेतात जाऊन तात्काळ पंचनामे करावीत व तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ अनुदान मंजूर करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते गणेश पांडुळे यांनी केली आहे जर सरकारने शेतकऱ्यांना 50 टक्के नुकसान भरपाई अनुदान नाही दिले तर आम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्ता रोको करू अशी माहिती गणेश पांडुळे यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली.
stay connected