दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीस पाजले विष
आष्टी पोलिसात गुन्हा दाखल
आष्टी ता.६ (बातमीदार)- दारू पिण्यासाठी पत्नीस पैशाची मागणी केली असता पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीस
शिविगाळ करून मारहाण करत विष पाजल्याची घटना आष्टी तालुक्यातील शिदेवाडी येथे शनिवारी (ता.५) घडली. पत्नीच्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यामध्ये रविवारी (ता.६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनीवारी (ता.५) अर्चना सतिश दरेकर (वय ३० वर्षे ) आपल्या घरी काम करत असताना पती सतीश शिवाजी दरेकर यांने घरी येऊन दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता माझ्याकडे पैसे नाहीत असे म्हणताच सतिश दरेकर याने पत्नी अर्चना हिस शिविगाळ करत मारहाण केली व माळ्यावर असलेली विषाची बाटली घेऊन येत विष पाजले. या प्रकरणी अर्चना दरेकर यांनी रविवारी पती सतीश दरेकर विरुध्द आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी हे करत आहेत.


stay connected