मराठा आरक्षण व विविध मागण्यांसाठी क्रांतीदिनी आष्टी तहसीलदारांना निवेदन देणार - इंजि.तान्हाजी जंजिरे

 मराठा आरक्षण व विविध मागण्यांसाठी क्रांतीदिनी आष्टी तहसीलदारांना निवेदन देणार - इंजि.तान्हाजी जंजिरे...........



    सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांती दिनी आजाद मैदान मुंबई येथे मराठा आरक्षण व समाजाच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आष्टी तालुका मराठा सेवा संघ व सकल मराठा बांधवांच्या वतीने आष्टी तहसीलदार यांना या विषयावर निवेदन देण्यात येणार आहे.

   मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.१) मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा.२) सध्या मराठा आरक्षण रद्द झालेले आहे त्यामुळे प्रलंबित नियुक्त्या त्वरित कराव्यात.३) ओबीसी प्रवर्गातील प्रगत जातींना या प्रवर्गातून वगळण्यात यावे.४) खुल्या प्रवर्गात इतरांना संधी देऊ नये. त्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा…५) कोपर्डी प्रकरणातील आरोपींना झालेल्या शिक्षेच्या संदर्भात शासनाने त्वरित लक्ष घालावे.६) 2017 मध्ये अन्याय झालेल्या पीएसआय, आरटीओ, राज्यसेवा मधील महिलांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे.

    तरी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व इतर सर्व कक्षांचे पदाधिकारी ,कार्यकर्ते , मराठा समाजातील युवक, विद्यार्थी , महिला भगिनी,

मराठा समाज बांधवांनी व भगिनींनी मोठ्या संख्येने 9 ऑगस्ट 2023, क्रांतीदिनी सकाळी ११ वाजता ,तहसील कार्यालय आष्टी ,येथे हजर राहावे. असे आवाहन मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष इंजि. तान्हाजी बापू जंजिरे यांनी केले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.