डोईठाण येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा
--------------------
संदिप जाधव/आष्टी
तालुक्यातील डोईठाण येथे आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी मौजे डोईठाण तालुका आष्टी जिल्हा बीड येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा डोईठाण यांच्या वतीने ७६ वा स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य तथा जेष्ठ नागरिक भिमराव शंकर तरटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून एम एम पाखरे गुरुजी तसेच डी एम खंडागळे गुरुजी उपस्थित होते. यावेळी तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करून राष्ट्रगीत सादर करण्यात आले तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा डोईठाण यांच्यावतीने पेढे वाटून स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला यावेळी ग्रामसेवक संजय सानप ग्रामपंचायत सदस्य बाळू काका चव्हाण सरपंच पती नवनाथ खंडागळे पोलीस पाटील दत्ता नाना तरटे ॲड. जितेंद्र खंडागळे मिलिंद पाखरे महादेव खंडागळे नवनाथ खंडागळे मधुकर खंडागळे नाना पाखरे लक्ष्मण खाडे सातपुते बाबा शहादेव खंडागळे अशोक मोरे रोहित खंडागळे शिवाजी बाबा तरटे तसेच सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील नागरिक पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार मिलिंद पाखरे यांनी मानले.


stay connected