आम आदमी पार्टी अमरावती तर्फे ध्वजारोहण व तिरंगा रॅली


 आम आदमी पार्टी अमरावती तर्फे ध्वजारोहण व तिरंगा रॅली


अमरावती ( प्रतिनिधी ) -

आम आदमी पार्टी अमरावती जिल्हा तर्फे पाटी कार्यालय जिल्हा उद्योग केंद्रा समोर जिल्हाध्यक्ष इंजी सुभाष गोहत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे के.डी.देशमुख व १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा देण्यात आल्या. आप राज्य सचिव अॅड मनिष मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती महानगर अध्यक्ष डॉ पंकज कावरे, संघटन मंत्री अॅड डॉ प्रविण बारंगे युवा अध्यक्ष नागेश लोणारे यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली. व त्यानंतर आम आदमी पार्टी कार्यालयात पासुन,कलेक्टर आॅफिस, इर्विण चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा हार अर्पण करून जयस्तंभ चौक, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण  राजकमल चौक, राजापेठ, या मार्गाने महानगरात तिरंगा रॅली काढण्यात आली. तिरंगा रॅलीमध्ये पदाधिकारी, कार्यक्रर्त व नागरीकांनी सहभाग घेतला, भारताला एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक ,न्याय विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र,दर्जाची व संधीची समानता, भारताच्या सगळ्या नागरीकास प्राप्त होण्याकरिता लढण्यासाठी आम आदमी पार्टी कटिबद्ध आहे. आम आदमी पार्टी च्या वतीने देशातील दिल्ली सरकार व पंजाब सरकार च्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेसाठी शिक्षण आरोग्य व इतर हिताची कामे जनतेला माहित व्हावी या उद्देशाने स्वतंत्र दिन तिरंगा रॅलीच्या माध्यमातून पोहचावी. यावेळी जिल्हा संघटन महेश देशमुख, सचिव प्रविण काकड, कोषाध्यक्ष गोपाल तराळे, उपाध्यक्ष नईम शेख, प्रमोद कुचे, सुरेंद्र उमाळे,रूषीकेश झासकर, डॉ भुषण घुले महिला संघटन मंत्री रेखा हजारे, सचिव मयुरी लोणारे, कोषाध्यक्ष राजेश्री बारंगे, तपोवन प्रभाग अध्यक्ष भाग्यश्री उमकराव,उपाध्यक्ष डॉ भारती जाधव,डाॅ रूपाली कावरे,सैय्यद मुशर्रफ,वसीम, खान, कैलास जयसिंगपूरे देशमुख साहेब,माहुलकर,सतिश दुबे,प्रतिक ढाणके, विक्रांत गायगोले, धिरज उके, गौरव रामटेके, शाम मेश्राम, फारूख खान, मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.