खरडगव्हाण येथे कृषिदूतांचे आगमन

 खरडगव्हाण येथे कृषिदूतांचे आगमन




आष्टी दि. 12 (प्रतिनिधी):- 


आष्टी तालुक्यातील खरडगव्हाण येथे आष्टी येथील श्री छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर, कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विध्यार्थी कृषीदूत यांचे  खरडगव्हाण गावात आगमन झाले आहे यावेळी कृषीदूत जगताप शिवप्रतिक ,कोकाटे रेवननाथ ,खंदारे सोपान ,भोसले सागर ,राठोड अक्षय ,जेट्टी किरण, मुला वेंकटशिवाप्रसाद रेड्डी यांचे शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन स्वागत केले. प्राचार्य डॉ श्रीराम आरसुळ व प्रा. तांबोळी आय. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदुतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२३- २०२४ याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली हे कृषीदुत शेतकरी यांना ३ महिने गावकऱ्यांना शेति विषयी मार्गदर्शन करणार आहेत यावेळी सरपंच निता सोमनाथ वाडेकर, उपसरपंच बापु येरकळ, ग्रामसेवक संजय एकशिंगे , ग्रामपंचायत सदस्य अश्पाक शेख ,मीनाताई काळोखे,पार्वती काळोखे, कार्यक्रम अधिकारी प्रा. काळे सर शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवप्रतिक जगताप याने करत असताना कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२३- २०२४विविध शेतीसंबंधी व्यवसाय याबद्दल गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.