संभाजी भिडेंवर कारवाई करा - केंद्रीय मंत्री रामदास आठवले
उल्हासनगर दि :- संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणे, हे त्यांच्या वयाला शोभत नाही. महात्मा गांधी हे स्वातंत्र्य सेनानी होते. इंग्रजांच्या काळात त्यांनी लढा केला होता. भिडे हे अनेक वेळा आपल्या पद्धतीने भूमिका मांडतात. परंतु जनतेच्या भावना दुखावतात. त्यामुळे मला असं वाटते की, अशा प्रकारचे वक्तव्य करणाया भिडेंवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर कारवाई करावी. अशी आमची मागणी असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय भीमाई स्मारकाचे प्रेणेते व दि बुद्धिस्ट कल्चर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत स्मुर्तीशेष दादासाहेब खरे यांचा शांती प्रकाश कम्युनिटी हॉल उल्हासनगर उल्हासनगर-४ कुर्ला कॅम्प येथे पुण्यनमोदन व अभिवादन सभेत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. डॉ. रामदासजी आठवले यांनी अभिवादन केले. या अभिवादन सभेत आमदार डॉ. बालाजी किनेकर सुरेशदादा बार्शीग दयाल बहादुरे माजी उपमहापौर भगवान भालेराव, बाळासाहेब गायकवाड प्रल्हाद जाधव सुनील अप्पा भालेराव, अरुण पठारे, खंडू शिंगारे आदी नेत्यांनी अभिवादन केले.
यावेळी त्यांना संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत विचारले असता, महात्मा गांधीजी हे
स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी इंग्रजांच्या काळात चांगला लढा केला होता. अशा गांधीजींच्या विरोधात असं वक्तव्य करणे, हे त्यांच्या वयाला शोभत नाही. त्यामुळे भिडेंवर कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी असल्याचेही आठवले यावेळी म्हणाले.


stay connected