राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अपशब्द वक्तव्य केलेल्या संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा -- रवी काका ढोबळे .
------------------------
कडा/प्रतिनिधी .
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल वाईट वक्तव्य केलेल्या संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी यांनी तहसील कार्यालय येथे जाऊन तहसीलदार यांना निवेदन दिले आहे त्याप्रसंगी रवी काका ढोबळे यांनी संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करायची मागणी केली आहे .
ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व अनेक महापुरुषांनी आपल्या भारत देशासाठी बलिदान दे देवून व आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून दिले अशा महापुरुषांबद्दल अपशब्द कोणीही वापरू नये तरी संभाजी भिडे गुरुजी यांनी अपशब्द वापरून वाईट वक्तव्य केले अशा देशद्रोही वर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी केली आहे .
प्रसंगी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची सचिन अरुण , आदिनाथ महाडिक, अनुसूचित जाती जमातीचे तालुकाध्यक्ष बाळू कटके ,वसंत चव्हाण, काकासाहेब कर्डिले व सर्व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


stay connected