शिक्षक बँकेचा पॅनल बोर्ड वाटपाचा निर्णय स्तुत्य-लांगोरे

 शिक्षक बँकेचा पॅनल बोर्ड वाटपाचा निर्णय स्तुत्य-लांगोरे



अहमदनगर-जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने मिशन आपुलकी अंतर्गत शिक्षक बँकेच्या सेस फंडातून जिल्ह्यातील 28 प्राथमिक शाळांना इंटरॅक्टिव बोर्ड वाटपाचा जो निर्णय घेतला आहे तो स्तुत्य असून जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावत आहे. इंग्रजी माध्यमातील मुलांचा ओढा मराठी शाळेकडे वाढला आहे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संभाजीराव लांगोरे यांनी केले.

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वतीने इंटरॅक्टिव्ह बोर्ड वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील,उप लेखा अधिकारी श्री रमेश कासार, गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे, शिक्षक नेते श्री बापूसाहेब तांबे, गटशिक्षणाधिकारी श्री अनिल भवार, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती कुलट मॅडम, शिक्षक बँकेचे चेअरमन डॉ. संदीप मोटे,व्हा. चेअरमन कैलास सारोक्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी बोलताना श्री लांगोरे पुढे म्हणाले कि, जिल्ह्यातील जवळपास एक हजार शाळांना इंटरॅक्टिव्ह बोर्ड मिशन आपुलकीतून प्राप्त झाले आहेत.लोक सहभागातून जिल्हा परिषदेतील शाळांनी 21 कोटीच्या आसपास निधी जमा केला. यावरूनच शिक्षकांप्रती समाजात असलेली आदराची भावना आणि शैक्षणिक दर्जा यामुळेच ही एवढी मोठी वर्गणी जमा झाली. यापुढे राहिलेल्या शाळांनी लोकसभागातून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करावे व त्याचा दैनंदिन वापर शैक्षणिक अध्यापनात करावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील म्हणाले कि शिक्षक बँकेने ठरल्याप्रमाणे शब्द पाळून 28 प्राथमिक शाळांना इंटरॅक्टिव्ह बोर्ड देऊन शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी एक चांगले पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे लक्ष दिल्यामुळे स्कॉलरशिप परीक्षेत अहमदनगर जिल्हा परिषदेचा राज्यात तिसरा क्रमांक आला आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा जिल्हा परिषदेचे विद्यार्थी पुढे जातात. यापुढे शिक्षकांना  दैनंदिन माहिती देण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. ॲपद्वारेच महिन्यातून एकदाच माहिती अपडेट केली कि पुन्हा वारंवार माहिती द्यावी लागणार नाही. त्यामुळे शिक्षकांना ज्ञानदानाच्या कार्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

यावेळी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर यांच्या सूचनेप्रमाणे सेस फंडातून इंटरॅक्टिव्ह बोर्ड वाटपाचा संकल्प केला. त्याची परिपूर्ती करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. शिक्षकांना जास्तीत जास्त ज्ञानदानासाठी वेळ मिळाला पाहिजे , त्यांच्याकडील अतिरिक्त कामे कमी झाली पाहिजेत. यासाठी आपल्या जिल्हा परिषदेने आपल्या जिल्ह्यामध्ये उपक्रम सुरू करून आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदाच माहिती जर संकलित केली, तर शिक्षकांना तीच ती माहिती वारंवार द्यावी लागणार नाही. एवढ्या मोठ्या अडचणीवर मात करून अहमदनगर जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षक यांनी शाळेचा कायापालट केला असून शाळेच्या गुणवत्तेमध्ये राज्यांमध्ये एक आगळावेगळे स्थान निर्माण केले आहे, असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक बँकेचे चेअरमन डॉ. संदीप मोटे यांनी करून शिक्षक बँकेचा लेखाजोखा सभागृहासमोर मांडला. शिक्षक बँक ही शिक्षक आणि शिक्षण या प्रक्रियेमध्ये नेहमीच योगदान देत आहे, यापुढेही देत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

  यावेळी राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले व एरंडोली शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक श्री भंडारे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन श्री गोकुळ कळमकर,संतोष दुसुंगे, अर्जुनराव शिरसाट, बाबासाहेब खरात,आर. टी. साबळे,आबासाहेब दळवी,बाळासाहेब कदम,शरद वांढेकर, मुकेश गडदे,राजेंद्र निमसे,रमेश दरेकर, संभाजी आढाव,शिक्षक बँकेचे संचालक श्री भाऊराव रहिंज, बाळासाहेब सरोदे, शशिकांत जेजुरकर, बाळासाहेब कापसे, ज्ञानेश्वर शिरसाठ,रमेश गोरे कल्याण लवांडे, गोरक्षनाथ विटनोर, योगेश वाघमारे,महेश भनभने,संतोष राऊत, बाळासाहेब तापकीर, सूर्यकांत काळे, कारभारी बाबर,कैलास सहाने,माणिक कदम, रामेश्वर चोपडे, अण्णासाहेब आभाळे,

सचिन नाबगे,संदीप मेहेत्रे,निवृत्ती धुमाळ, रविकिरण साळवे, बाबासाहेब दिघे,विठ्ठल काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक बँकेचे माजी चेअरमन श्री साहेबराव अनाप यांनी केले तर आभार संचालक श्री भाऊराव राहिंज यांनी मानले.यावेळी 28 शाळातील मुख्याध्यापक,तंत्रस्नेही शिक्षक,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,सरपंच आदि पदाधिकारी उपस्थित होते.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.