Bhimrao Dhonde : बालपण ते शिक्षणमहर्षी

 Bhimrao Dhonde : बालपण ते शिक्षणमहर्षी

Bhimrao Dhonde




मराठवाडा ही संतांची भूमी पण कधीकाळी निजामाच्या जुलमी राजवटीत सापडली होती. सतत दुष्काळी भाग म्हणून मराठवाड्याची ओळख. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका त्याला अपवाद नाही. याच आष्टी तालुक्यात रुई नालकोल नावाचे  एक लहानसे गाव आहे. या रुई नालकोल गावात आनंदराव शंभू धोंडे आणि सौ. गंगुबाई आनंदराव धोंडे या कष्टाळू दाम्पत्याच्या घरात 5 ऑगस्ट 1955 रोजी या दांपत्याला पुत्ररत्न झालं, त्याचं नाव ठेवलं भीमराव.

शिंपल्यात मोती सापडावा तस त्या गावात हे गुणी पोर जन्माला आलं.



भीमराव सात वर्षांचे असताना गावातल्या प्राथमिक शाळेत घातलं ते साल होतं 1962. चीनच्या आक्रमणाने सगळा भारत ढवळून निघालेला होता तेव्हा "जिंकू किंवा मरू" या गाण्यावर प्रभात फेरीत पोरांची पावले थिरकत होती.

 देशासाठी काहीतरी करावे हा विचार मनात रुजत गेला. गावात माध्यमिक शाळेची सोय नव्हती त्या कारणाने त्यांना गाव सोडावा लागलं मग निमगाव चोभा विद्यालय गाठलं. पहिल्या फेरीतच केंद्रावर होणारी अकरावीची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. पोर मॅट्रिक पास झाले या जाणीवने पालक भारावले.




भीमरावांच्या व्यक्तिमत्त्वाला दुसरी एक ठळक बाजू होती त्यांना व्यायामाचे महत्त्व समझल होतं. वडील आणि चुलते यांच्याकडून व्यायामाचा वारसा जणू लाभला होता. दिवस सरत गेले तसे तसे आपण महाविद्यालयात जावं, पदवीधर व्हावं, नाव मिळवावं असं भीमरावांना मनापासून वाटत होतं. तसे पाहिलं तर घरात नुसते अक्षर ओळखीचे धनी परंतु वडिलांना वाटायचं पोरांन शिकावं, मोठा व्हावं, नाव मिळवावं.

 पुढे जाऊन अकरावीला भीमराव पास झाले, सर्जेराव बोडखे नावाच्या मित्राला बरोबर घेऊन नगरला गेले. 1972 ला प्राचार्य डॉ. तोडमल यांच्या महाविद्यालयात भीमरावांनी प्रवेश घेतला तोही कला शाखेत. सर्जेराव बोडखे तसे सीनियर सगळ्या वाटा आडवाटा माहिती असल्यामुळे फॉर्म भरण्यापासून सगळे सहकार्य त्यांनीच केले, नंतर त्यांच्या सोबत बोडखे आणि एकशिंगे होते. हे तिघे जिवलग मित्र.



 कॉलेजचे दिवस सुरू झाले व्यायाम मात्र कधी चुकत नसे. पहाटे उठून भीमराव व्यायाम करत, उड्या मारत, जोर बैठका काढत त्यामुळे शरीर डौलदार दिसायचं. वृत्ती स्वाभिमानी, उमदा स्वभाव, खेळाची विलक्षण आवड कुस्तीत विरोधकाला चितपट करत अंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली.

त्यांनी महाविद्यालयाला यश मिळवून दिलं. "हुकुमी विजेता" अशी त्यांची प्रतिमा बनली. विद्यार्थी दशेत नुसती देहाची बांधणी करून उपयोग नाही तर बुद्धीची, विचारांची बांधणी करायला हवी हे त्यांनी हेरले.

चांगले मित्र जोडले विचार विनिमय सुरू झाला हे करत असताना गावाकडची नाळही कायम ठेवली. व्यसन कधी केले नाही आणि मित्रांनाही करू दिले नाही. नेहमी सरळ मार्गाने जायचं, डावपेचांचा अवलंब न करता हे समाजहित साधता येतं हे त्यांनी ओळखलं होतं. त्यांनी बी.एची पदवी तर मिळवली पण अहमदनगर मध्येच एलएलबी कायद्याची पदवी ही प्राप्त केली.



 माझं ज्ञान हे समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ ठरलं पाहिजे या  जाणिवेने ते कामाला लागले. शेतकरी हा त्यांच्या समाजकार्याचा केंद्रबिंदू बनला. आपल्या राजकीय कारकीर्दीचा शुभारंभ त्यांनी शेतकऱ्यांच्या समोर ठेवून केला. साहेबांची राजकीय कारकीर्द 1980 पासून सुरू झाली आणि आजतागायत सुरूच आहे.  

शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुला मुलींना शिक्षण मिळाले पाहिजेत यासाठी त्यांनी शेतकरी शिक्षण मंडळ, आनंद चॅरिटेबल संस्था, किसान शिक्षण संस्था, छत्रपती शाहू education society यांची स्थापना केली. शाळेसोबतच त्यांनी महाविद्यालयेही उभारले.

 हा देश शेतीप्रधान आहे शेतकऱ्यांची मुले बी.एससी ऍग्री या पदवीसाठी पात्र ठरली पाहिजेत यासाठी साहेबांनी महापुरुषांचा आदर्श ठेवून कृषी महाविद्यालय उभारून त्या महाविद्यालयास शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय असे नाव दिले आहे. साहेब प्राध्यापकांना सन्मानाची वागणूक देतात. विद्यार्थ्यांनाही आपुलकीने समजावून घेतात. साहेबांच्या जन्मदिवसानिमित्त हा छोटासा प्रयत्न आहे कारण त्यांच्याबद्दल जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे. अशा या व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आपले आरोग्य निरोगी, संपन्न राहो हीच प्रार्थना.


           प्रा. मेटे व्ही. एस.
छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर   
       कृषी महाविद्यालय, आष्टी.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.