Suresh Dhas यांनी मुक्ती संग्राम दिनाच्या जागवल्या आठवणी.
*******************************
वर्षातील एक कॅबिनेट बैठक संभाजीनगरला व्हावी आ.धसांची मागणी.
********************************
******************************
आष्टी (प्रतिनिधी)
आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७५ वा अमृत महोत्सव मराठवाड्यात सर्वत्र उत्साहाने साजरा करणार आहोत.मात्र यासाठी ज्या महान विभूतींनी मराठवाडा मुक्ती स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या प्राणाची आहूती देऊन आपले प्राण गमावले आणि आम्हाला निजामाच्या रझाकारातून मुक्त केले.अशा महामानवांना आम्ही नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केले पाहिजे म्हणत आ.सुरेश धस यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासाला पुन्हा एकदा नव्याने झळाळी देण्याचे काम अभिनंदन प्रस्तावावर बोलताना विधानपरिषदेत केले.
ते पावसाळी अधिवेशन २०२३ मध्ये अभिनंदन प्रस्तावावर बोलत होते.
पुढे बोलताना धस म्हणाले की,देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परंतू त्यानंतरही मराठवाडा हा हैद्राबाद येथील निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होता. देशात त्यावेळी अस्तित्वात असलेली अनेक संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली होती. मात्र हैद्राबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. स्वातंत्र्यापूर्वीपासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.
निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या रझाकार संघटनेने चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबला होता.तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला. निजामांच्या या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. तेव्हा मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यात आला होता.
हैद्राबाद संस्थानामध्ये मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग सामील होता. हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर पाशवी अत्याचार सुरु केले असताना या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले.
आपल्या जीवाची पर्वा न करता मराठवाड्याच्या गावागावातून हा संग्राम लढण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. यामध्ये आष्टी तालुक्यातील अंभोऱ्यातून याची सुरुवात झाली.विशेष म्हणजे त्या काळात आष्टी ,पाटोदा तालुक्यातील अनेक स्वातंत्र्य सेनानी ज्यामध्ये प्रामुख्याने साहेबराव थोरवे,नानासाहेब पोकळे, सुदाम सातपुते, अश्रुबा राख,विठोबा धस, जंजिरे यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपले बलिदान दिले आहे.अशा या थोर महात्म्यांना विनम्र अभिवादन करून आपण हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करतो आहोत.ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब जरी असली तरी दुसरीकडे आजही आम्हाला पाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील लोकांशी झगडावे लागत आहे.त्यामुळे मराठवाड्याच्या हक्काच्या २४ टी. एम. सी पाणी देण्याच्या संबंधातील कामे जलदगतीने व्हावीत तसेच आष्टी तालुक्याला नवसंजीवनी ठरणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजना, खुंटेफळ साठवण तलाव कामाबाबत तात्काळ कसे पूर्ण होईल या कडे सरकारचे लक्ष असल्यामुळे त्या बद्दल आभार मानतो असे शेवटी आ.सुरेश धस म्हणाले.
***************************
एक तरी मंत्रिमंडळ कॅबिनेट मिटींग संभाजीनगरला व्हावी.
*************************
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मराठवाड्याच्या मातीत महान युगपुरुष जन्माला आले,अनेकांनी आपापल्या क्षेत्रातून महाराष्ट्र राज्याला नवलौखकिक मिळवून नदिला आहे.त्यामुळे या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्य सरकारला विनंती करतो की वर्षातून एक मंत्री मंडळ कॅबिनेट बैठक संभाजीनगर येथे करण्याची मागणी आ.सुरेश धस यांनी केली.


stay connected