संत शेख महंमद महाराजांनी मानवतेची बीजे रोवली : मेटे महाराज
संत शेख महंमद महाराज जयंती उत्साहात साजरी
अहमदनगर (प्रतिनिधी) संत शिरोमणी शेख महंमद महाराज ह्यांनी अभंग रचना आणि साहित्यातून माणूसपण जपले. जाती व धर्मभेद ह्यांना नाकारून मानवतेची बीजे रोवली. त्यातूनच समाजात एकोपा निर्माण झाला, असे मत संत शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी व्यक्त केले.
संत शेख महंमद महाराजांच्या जयंतीनिमित्त वाहिरा येथे आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाप्रसंगी सरपंच रंगनाथ गाडे, उपसरपंच योगेश झांजे, भाऊसाहेब झांजे, अंकुश झांजे, शिवाजी झांजे पाटील, ह.भ.प. सोमनाथ महाराज मेटे, किसन आटोळे सर, सोमनाथ शेलार सर, विजय महाराज घोंगडे, गणेश माळशिकारे, कल्याण घोंगडे, किरण बोंद्रे, गंगाधर आटोळे, गणेश झांजे, सुदाम मेटे, प्रमोद शेलार, सदाशिव पगारे, सुखदेव महाराज झांजे, मधुकर टोणे, सोपान पगारे, प्रविण आटोळे, आदींसह वाहिरा पंचक्रोशितील ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलतांना मेटे महाराज म्हणाले की, 'संत शेख महंमद महाराजांनी आपल्या साहित्यकृतीतून माणूस ही एकमेव जात अन त्यांचा माणुसकी हा एकमेव धर्म' असल्याचे सांगितले. त्यामुळे जातीभेद आणि धार्मिक तेढ, द्वेष कमी होत गेला. धार्मिक द्वेष आणि तेढ निर्माण करणाऱ्या शक्ती डोके वर काढत आहेत. त्यांना रोखण्यासाठी संत विचारांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे मेटे महाराज म्हणाले.


stay connected