अंबरनाथ विधानसभा क्षेत्राकरीता " भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत " ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर
आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या मागणीला यश
उल्हासनगर दि :- अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषद व उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने विविध विकास कामे प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु, निधी अभावी विकास कामे हाती घेता येत नसल्याने या विकास कामांना समाज कल्याण विभागा मार्फत निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे केली होती. या मागणीला आता यश आले असून समाज कल्याण विभागाच्या "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत " या विकास कामांकरिता ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचा शासन निर्णय २० जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.


stay connected