Environment तर शुद्ध हवा विकत घेण्याची वेळ येईल
एक चित्रपटासारखी परिस्थिती जर आपल्या सबंध जगावर त्याच्याच अहकारिकपणामुळे आली तर आश्चर्य वाटायला नको ? ते म्हणजे वातावरणातील वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे आपणास 'शुद्ध हवा विकत घ्यावी, लागली तर ?ही कल्पना पण आपणास कळवत नसेल हे जग सत्यात उतरवायचे नसेल तर सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून वाढते प्रदूषण टाळण्यासाठी सर्व जगाने गांभीर्य पूरक विचार करून कडक एकच नियमावली करत त्याच्याविषयी कर्तव्य म्हणून कार्य करणे आज काळाची गरज आहे, हे नक्की यावेळी सांगावेसे वाटते.
२१ व्या शतकातील आपण तिसऱ्या दशकात प्रवेश करताना सबंध जगभरातील विचारवंतांना हा प्रश्न पडला की, २१ व्या शतकातील पृथ्वीचे स्वरूप झपाट्याने बदलताना दिसत असून पर्यावरण व हवामानातील बदल येणाऱ्या काळात कसे असतील ? व आपण सर्वजण त्याला कसे सामोरे जाऊ ? वाढत्या प्रगतीच्या नावाने आपापल्या विकासाच्या दृष्टीने पर्यावरणीय संतुलन हा मानव आपल्या स्वार्थी वृत्ती पोटी ढासळताना दिसत असून, सबंध जगाची स्पर्धा पाहतात सत्ता स्पर्धा , शहरीकरण, औद्योगीकरण, जैविक असमतोल, नैतिक जाणिवेचा अभाव यासह 'जल-जंगल- जमिनी'तील मानवाचा वाढत चाललेला हस्तक्षेप मानवनिर्मित संकटांना आव्हान देत आहे, ही गंभीर बाब असून, जर हे वेळीच सावरले नाही तर येणारा काळ आपल्यासह आपल्या पिढीलाही कधीच माफ करणार नाही हे निश्चित. पृथ्वी ,वायू ,अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित असलेल्या पंचतत्त्वावर आधारित आपली 'वसुंधरा' जपवणूक करणे आणि ही निसर्गाच्या पंचतत्वा सोबत कोणतेही चेलेंज न करता जैवविविधता जपणे महत्त्वाचे ठरणारे आहे.निसर्गाशी एकरूप होऊन कार्य करणे आज गरजेचे वाटते आहे.
आपली वसुंधरा समृद्ध जैवविविधतेने नटलेली असून, पृथ्वी मानवी हस्तक्षेपामुळे असुरक्षित झाली आहे ,संकटात सापडली आहे .आपल्या पृथ्वी सारखी जीवसृष्टी इतर ग्रहावर नाही अत्यंत उत्तम व प्रभावी पृथ्वी मानवीय 'मी' पणामुळे वरचेवर धोक्यात घालत असून इतर ग्रहापेक्षा वेगळेपण असलेली पृथ्वीवर असणारा प्राणवायू आणि पाण्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे .म्हणून तर यावर सजीवसृष्टी सह वनस्पती असणारा एकमेव ग्रह आपली पृथ्वी आहे. हे जर टिकवायचे असेल तर पृथ्वीवर वाढत चाललेला मानवाचा 'मी 'पणा कमी करणे गरजेचे आहे. व होणारे प्रदूषण थांबवणे महत्त्वाचे आहे.कोरोनाचा कठीण काळ सबंध जगाने अनुभवला श्वासाचे महत्त्व त्यावेळी कळुनही न वळल्याचे दिसत आहे. औद्योगीकरणासह हवा, पाणी, माती यात भारतासह जगभरात प्रदूषण वाढ होत असून पर्यावरण संवर्धनाच्या शाश्वत उपाययोजनासाठी या औद्योगिक प्रदूषणाचे व्यवस्थापन करणे, आज काळाची गरज आहे. पर्यावरण पूरक व्यवसाय करणे महत्त्वाचे आहे. वस्तूची निर्मिती करताना त्याचा पर्यावरणीय दृष्टीकोणातून विचार करूनच त्याची निर्मिती झाली पाहिजे. प्रदूषणाचे स्त्रोत जरी अनेक असले तरी कारखान्याचा मोठा वाटा त्यात असतो.
हवेच्या प्रदूषणाचा जर आपण विचार केला तर हे प्रदूषके घनकानाच्या तसेच वायुरूपात आढळतात. प्रदूषकामुळे मानवी स्वास्थ्याबरोबरच पर्यावरणावर ही परिणाम पाहावयास मिळतात. खनिज इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे वायू दूषित होऊन बाहेर पडतो, वाहनांच्या वाढत्या वातावरणात तसेच कार्बन मोनॉक्साईड, कार्बनडाय-ऑक्साइड सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन सह इतरही वायू प्रदूषके मानवी आरोग्यासाठी तसेच वनस्पती व इतर घटकावर गंभीर परिणाम करणारे ठरतात. घनकचरा व्यवस्थापन, औद्योगिक कचरा तसेच जैववैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापनासह इतर कचराचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.
मानवाच्या वाढत चाललेल्या गरजा आणि विकासाच्या नावाखाली आपलेच खरे करणारा माणूस पृथ्वीला छिद्र पाडण्याचे कार्य करत, ओझोनचा अति निल किरणे शोषून घेण्याचे कारण ठरत आहे. या विकासाच्या नावाने पहिला बळी वृक्षतोडीने करून होतो हे जर थांबले नाही तर, जागतिक स्तरावरील हे वाढत चाललेले तापमानाला कोणीच थांबू शकत नाही. सबंध जगाने हरित पट्ट्याची वाढ करून हे बिघडलेली निसर्गाची चक्र सुधारण्यास प्रयत्न केले पाहिजेत. नद्या ,नाल्या ,ओढे ,डोंगर ,समुद्र नैसर्गिक रचना असलेले स्त्रोत वनातील अतिक्रमण थांबवले पाहिजे, एकूणच काय तर मानवाने स्वार्थासाठी जो वसुंधरेचा वापर आपल्या पद्धतीने चालवल्या आहे तो बंद करून आता निसर्गाला देण्याची वेळ आलेली आहे. आपली जैवविविधता जपत आपल्या जीवनात पर्यावरण पूरक वस्तूचा वापर करून जगणं व लहान लहान गोष्टीतून निसर्गाला जपणं आज काळाची गरज असून पृथ्वीतालावरील सबंध मानवाने मोठ्या प्रमाणात वृक्षाची आपापल्या पद्धतीने आपल्या हवामानाला अनुकूल अशीच झाडाची लागवड करून अधिकाधिक निसर्गाला जपणे वाढवणे गरजेचे संबंध जगाला असून संबंध जगाला कोरोना महामार्ग श्वासाचे महत्त्व पटवून दिले तरी, शुद्ध हवेचे महत्त्व पटलेले दिसत नाही, शुद्ध हवे अभावी जीवावर बेतू शकते हे त्यावेळी कोरोनाने दाखवून दिले हे कळाले असताना त्याचे महत्त्व वेळीच गांभीर्यपूर्वक घेऊन पाऊल उचलणे आज काळाची गरज असून' हवा जर विकत घ्यायची नसेल, तर पर्यावरणाला जपून त्याची वाढ केल्याशिवाय पर्याय नाही हे नक्की यावेळी सांगावेसे वाटते ..!'
- राहुल मोरे
मो.न.९४०४१८११८


stay connected