Ahamadnagar येथे पद्मगंगा फाउंडेशनच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण
तेजवार्ता संपादक बबलूभाई सय्यद राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
अडसूळ, खैरनार, वर्तक, जाधव, सय्यद , जोगदंड , आगाशे पुरस्काराचे मानकरी
अहमदनगर ( संदीप जाधव ) - पद्मगंगा फाउंडेशनतर्फे दरवर्षी उत्कृष्ट साहित्य कलाकृतीसाठी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतात. यंदा प्राचार्य अडसूळ, प्रतिमा खैरनार, जगन्नाथ वर्तक, प्रतिभा जाधव व पत्रकार बबलूभाई सय्यद यांना पद्मगंगा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे , मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.संदीप सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
पद्मगंगा फाउंडेशन तर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य अनिल सहस्रबुद्धे होते. यावेळी प्रा. डॉ. अनिल गर्जे, डॉ. रमेश खिळदकर, डॉ. प्रकाश सूर्यवंशी, डॉ. वर्षा कीर्तने डॉ. निर्मिला आयतलवाड, कल्याणी बरसमवाड , कवी चंद्रकांत पालवे, प्रा. गणेश भगत, समाज कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, प्रा संभाजी घोलप , माजी पंचायत समिती सदस्य संजय धायगुडे , दादासाहेब उदावंत , विक्रम ढोबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. संदीप सांगळे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यामध्ये लोकसाहित्य संशोधनाचे बीज गंगाधर मोरजे यांनी पेरले. तेच बीज आज या पुरस्काराच्या रूपाने फुललेले आहे. लोकसाहित्य हा जगण्याचा विषय आहे . तळागाळातील लोकांच्या व्यथा मांडण्याचे कार्य यातुन घडते . गंगाधर मोरजे यांनी लोकसाहित्याला साहित्यामध्ये मानाचे स्थान मिळवून दिले. तीच परंपरा प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर चालवीत आहेत.
अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. अनिल सहस्रबुद्धे म्हणाले, लोकसाहित्याचा अभ्यास कसा करावा. क्षेत्रीय संशोधन कसे करावे, याचे मापदंड गंगाधर मोरजे यांनी घालून दिले. लोकसाहित्य हा एक मराठी साहित्याचा महत्त्वाचा भाग असून लोकसाहित्याच्या माध्यमातून उपेक्षितांचे सांस्कृतिक जीवन मुख्य प्रवाहात आणण्याचे काम स्व .गंगाधर मोरजे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्मगंगा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. धोंडीराम वाडकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल बरसमवाड यांनी केले तर, डॉ. ज्ञानेश आयतलवाड यांनी आभार मानले.
राज्यस्तरीय पद्म गंगा पुरस्काराचे मानकरी
साहित्य - प्राचार्य आर. के. अडसूळ, प्रतिभा खैरनार, जगन्नाथ वर्तक, प्रतिभा जाधव, समाजिक - राजेश उल्लेवार, हानमंत काऊलवार, रावसाहेब राघुमोड, आप्पासाहेब आगाशे, पत्रकारिता - बबलूभाई सय्यद, शैक्षणिक - दिगंबर जोगदंड.




stay connected