Crime news : जामखेड येथे गांज्याची तस्करी करणार्या एकास अटक १० कीलो गांजा जप्त
जामखेड प्रतिनिधी
जामखेड पोलीसांचे पथक रात्री गस्त घालत असताना नगररोड वरील एका हॉटेलच्या समोरुन मोटारसायकलवर गांज्या घेऊन जात असताना एका आरोपीस मोटारसायकल सह पकडण्यात आले. त्याच्या कडुन कडून १० किलो गांजा सह एक लाख साठ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर इतर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.
पोलीसांन कडुन मिळालेली माहिती अशी की दि.८ जुलै २०२३ रोजी सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ए. पी. आय. सुनिल बडे, पो. ना. अजय साठे, पो काँ. प्रविण पालवे, पो.काँ. देवा पळसे यांचे पथक पेट्रोलिंग करत होते.
यावेळी त्यांना नगररोडवरील एका हॉटेल समोर, आष्टीकडून एक लाल रंगाची मोटार सायकल व तिच्या पेट्रोलटाकीवर एक काळ्या रंगाची बॅग ट्रिपल सिट असलेले मुले समोरून येताना दिसले. पोलीसांना त्यांचा संशय आल्याने आम्ही त्यांना रोडवर थांबण्याचा इशारा केला. यावेळी सदर गाडीवरील पाठीमागे बसलेले दोन इसम पोलीसांना पाहून पळून गेले व गाडीवर बसलेल्या एकास जागीच पकडून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संजय राजेंद्र पवार वय २३ वर्षे रा.जुन्या बस सँन्डच्या पाठीमागे, जामखेड येथे राहत असल्याचे सांगितले. त्याच्या कडुन मोटार सायकल एम. एच ०८ एस ७६४९ लाल रंगाची हि मिळून आल्याने सदर मोटार सायकलबाबत विचारपूस केली असता ती माझीच आहे असे सांगितल्याने त्यास सदर रंग बाबत विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तर दिल्याने ए. पी. आय. सुनिल बड़े यांनी बॅगची चैन खोलून पाहीले असता बॅगमध्ये विक्रीस प्रतिबंध असलेला उग्र वासाचा गांजा मिळून आल्याने ए. पी. आय. सुनिल बडे यांनी लगेच सदर बाबत पो नि महेश पाटील व तहसिलदार योगेश चंद्रे , मा. मुख्याधिकारी अजय साळवे यांना माहिती दिली. वजनकाटा धारक किराणा दुकानदार यास सदरची माहीती देवून कारवाई केली व हॉटेल समोर बोलावून घेतले.
सदर आरोपी संजय राजेंद्र पवार याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सांगितले की, सदरचा गांजा हा बबलू शंकर काळे रा. मिलींदनगर जामखेड (फरार) याचा असून तो माल बबलू काळे याने बाळू कांतीलाल काळे रा.खडकवाडी, जामखेड (फरार) यास सोबत घेवून सदरचा माल कोणाला देणार होता हे माहीत नाही असे सांगितल्याने ए पी आय बडे यांनी लाईटच्या प्रकाशात आरोपी याच्या कडे मिळून आलेला २ किलो वजनाचे ५ पुडे त्यास चिकट टेपने गुंडाळलेला असुन एकुण १० किलो गांजा तहसिलदार व दोन शासकीय पंचासमोर यांचे समक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आला मिळून आलेला गांजा व मोटार सायकल असा एकूण १,६०,००० /- रूपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवून जामखेड पोलीस स्टेशनला पुढील कारवाई करत असून पळून गेलेल्या आरोपीचा शोध जामखेड पोलीस हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला अ. नगर.,अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे कर्जत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, ए. पी आय सुनिल बडे, पो.कॉ संजय लाटे, पो. ना अजय साठे पो. काँ. देवा पळसे पो. काँ.प्रविण पालवे, पो.काँ. सचिन पिरगळ, पो. काँ.गणेश भागडे, पो. कॉ. घोळवे, पो. काँ. पाचपुते या पथकाने ही कारवाई केली आहे. . प्रतिनिधी नासीर पठाण सह पत्रकार आशोक निमोणकर जामखेड .
stay connected