Crime News :आष्टी पोलिसांनी दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या
दोन दुचाकीसहीत भामट्याला केले गजाआड
----------
राजेंद्र जैन / आष्टी
--------------
आष्टीसह नगर जिल्ह्यात दुचाकी वाहनांची चोरी करुन विक्री करणारा आरोपी वैभव उर्फ बाबासाहेब सुरोडे वय-२५ (रा. मातवळी ता. आष्टी) याच्या आष्टी पोलिसांनी मुसक्या आवळून गजाआड केले असून, त्याच्याकडून महागड्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस यांनी दिली.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मागील महिन्यात कडा येथील राहूल नेनसुखलाल बलदोटा यांची होंडा कंपनीची (एमएच-२३-बीए-५३१५) या क्रमांची अॅक्टीवा दि. ०८/०६/२०२३ रोजी मध्यरात्री घरासमोरुन चोरीला गेली होती. या संदर्भात बलदोटा यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांत गुरनं, २५३ कलम ३७९ भादवी अन्वये दुचाकी चोरीचा गुन्हा नोंद केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि अजीत चाटे, पोहेकाॅ रविराज निमसे, पोना हनुमंत बांगर, पोना. जाधव, पोशि मजहर सय्यद, पोशि तांबे, पोशि वाणी या पथकाने तांत्रिक पद्दतीने कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी वैभव उर्फ बाबासाहेब सुरोडेला ताब्यात घेऊन त्यास पोलीसी खाक्या दाखवून चौकशी केली असता, या गुन्ह्यात चोरी केलेली ग्रे रंगाची होंडाची अॅक्टीवा व काळ्या रंगाची स्कुटर चोरी करून आरोपीने मातकुळी येथील लक्ष्मी आईचा मळा येथे घरासमोर लावली असल्याची गोपनीय खबर मिळाळी. त्या दिशेने आष्टी पोलिसांनी तपास करुन दुचाकीसह आरोपीस ताब्यात घेऊन गजाआड केले. याप्रकरणी दोन दिवसांपुर्वी नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांनी चोरीच्या सहा बुलेट, दोन ट्रॅक्टर असा २४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींसह हस्तगत केला होता. सदर आरोपी जामिनावर सुटल्यावर त्याला पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेऊन गुन्ह्याची उकल केली. या वाहन चोरांच्या टोळीतला पोलिसांनी पकडलेला वैभव सुरोडेचा सहभाग उघड केला आहे.
stay connected