Crime News एटीएम फोडणार्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
अहमदनगर / प्रतिनिधी - एटीएम फोडणार्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. सविस्तर असे की, दिनांक ९ जुलै २०२३ रोजी फिर्यादी प्रशांत अशोक साळवे (वय ३६, धंदा नोकरी शाखा प्रबंधक बॅक ऑफ महाराष्ट्र वाकोडी फाटा, अहमदनगर) यांचे बॅक ऑफ महाराष्ट्र वाकोडी फाटा येथील एटीएम जवळ दोन अनोळखी इसमांनी त्यांचेकडील विना नंबर कारमध्ये सिल्व्हर रंगाची मारुती सुझूकी कंपनीची स्विफ्ट कारमध्ये येवुन गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन कट करुन मशिनमधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला. सदर घटने बाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२६/२०२३ भादविक ३७९, ५११, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर बाबत एसपी राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते. त्यानुसार पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, सोपान गोरे, सफौ/बाळासाहेब मुळीक, अतुल लोटके, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, संदीप दरदंले, भिमराज खर्से, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पोकॉ/सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, अमृत आढाव, बाळु गुंजाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, सफौ/भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/बबन मखरे, पोना/ज्ञानेश्वर शिंदे, चापोहेकॉ/संभाजी कोतकर व अरुण मोरे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके नेमून गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बॅक ऑफ महाराष्ट्रा येथील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन कट करुन चोरी करणारे रेकॉर्ड वरील आरोपींचा राहुरी परिसरात शोध घेताना पथकास एक सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार भरधाव वेगाने जाताना दिसली.
पथकाने संशयीत भरधाव कारची माहिती पोनि आहेर यांना दिली. पोलिस निरीक्षक आहेर यांनी तातडीने सुत्र हलवत संशयीत वाहन ताब्यात घेण्यास सांगितले. पथकाने खातगाव टाकळी गावचे शिवारात ताब्यातील वाहन स्विफ्ट कारला आडवे लावुन थांबबली व कार मधील दोन संशयीतांची विचारपूस केली. अजित अरुण ठोसर (वय २२, रा. मातकुळी, ता. आष्टी, जिल्हा बीड हल्ली रा. पंम्पींग स्टेशन, साईनगर, ता. संगमनेर), जमीर जाफर पठाण (वय २१, रा. खांडगांव, ता. संगमनेर) अशी त्यांनी नावे सांगितली. कारची झडती घेतली असता कारमध्ये ऑसीजन सिलेंडर, भारतगॅस कंपनीची टाकी, पेंट स्प्रे, गॉगल, स्टील रॉड, निळे व लाल रंगाचा पाईप, रेग्युलेटर, नोझल, ऍ़डजस्टेबल पक्कड व ओप्पो कंपनीचा मोबाईल मिळुन आला.
सखोल चौकशी केली असता साथीदार रविंद्र चव्हाण व शुभम मंजुळे (दोन्ही रा. खडकी, ता. कोपरगांव) यांचे सोबत मिळुन चोरी केल्याची माहिती दिल्याने त्यांना ताब्यात घेतले. तसेच रविंद्र वाल्मिक चव्हाण (वय ३२), शुभम पोपटराव मंजुळे (वय २५ दोन्ही रा. खडकी, ता. कोपरगांव) या दोघांनाही ताब्यात घेतले.
आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी भिंगार, राहुरी, वैजापुर, सातारा, अंभोरा, जिल्हा बीड परिसरात चोरी केल्याची कबुली दिली. एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपींवर दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. चारही आरोपींच्या ताब्यातून १८ लाख १६ हजार ५०० रुपये किंमतीची दोन मंहिंद्रा ट्रॅटर, एक स्विफ्ट कार, एक बुलेट, एक पल्सर मोटार सायकल व चोरीसाठी आवश्यक साधने अशा मुद्देमालासह ताब्यात घेवुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.


stay connected