Marathi News: खुंटेफळ साठवण तलाव होऊ नये यासाठी आमदार आजबे यांचाच विरोध...
*******************
आ.सुरेश धस यांचा पत्रकार परिषदेतून घणाघाती आरोप
***************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी वरदान ठरणारा खुंटेफळ साठवण तलाव करण्यासाठी मी दोन गावातील गावकऱ्यांचे दगड गोटे खाल्लेले असून शेतकऱ्यांचा विरोध शांत करून त्यांना तलावाचे महत्त्व समजावून दिल्यामुळेच खुंटेफळ साठवण तलाव आता मूर्त स्वरूपात येत आहे..
परंतु आ.बाळासाहेब आजबे यांचे सासरे बलभीम सुंबरे आणि इतर काही जणांनी हा तलाव होऊ नये यासाठी उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल केली होती हे आजचे आ. बाळासाहेब आजबे विसरले असतील परंतु जनता विसरलेली नाही..
या खुंटेफळ साठवण तलावातील कामाच्या तक्रारी बाबत चौकशी आ.बाळासाहेब आजबे यांनी आपल्या उर्वरित दीड वर्षाच्या काळात जरूर करावी तसेच महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये माझ्या विरुद्ध तक्रारी करणारे राम खाडे हे नाममात्र होते या तक्रारींचे बोलविता धनी आ. बाळासाहेब आजबे हेच आहेत..
खुंटेफळ साठवण तलाव क्षेत्रामध्ये बाहेरच्या लोकांनी जमिनी घेतलेल्या आहेत असा आरोप आमदार आजबे यांनी केला आहे परंतु माझे त्यांना आव्हान आहे की खुंटेफळ साठवण तलाव भूसंपादन क्षेत्रांमध्ये धस आडनावाचा एखादा ही कार्यकर्ता असेल तर मी आगामी विधानसभेची निवडणूक लढणार नाही परंतु पोकळ आरोप करून जर हा आरोप सिद्ध झाला नाही तर आ. बाळासाहेब आजबे यांनी देखील राजकारणातून निवृत्त व्हावे असा घणाघाती आरोप आ.सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला..
पुढे बोलताना ते म्हणाले की खुंटेफळ साठवण तलावाचे सर्वेक्षण करत असताना शेतकऱ्यांचा विरोध होता परंतु त्यांना साठवून तलावाचे महत्त्व समजून सांगून त्यांना तयार केले परंतु आजचे विधानसभा सदस्य बाळासाहेब आजबे यांचे सासरे बलभीम सुंबरे यांनी तीन अति शहाणे इसमांना बरोबर घेऊन औरंगाबाद उच्च न्यायालयात खंडपीठ येथे हा तलाव होऊ नये यासाठी याचिका दाखल केलेली होती ती अजून तशीच आहे काय ?
याची मला माहिती नाही परंतु जर असेल तर ती त्यांनी मागे घ्यावी अशी त्यांना माझी विनंती आहे त्या काळामध्ये तालुक्यातील तीनही मातब्बर राजकीय नेते आमची कुचेष्टा करत हा तलाव कुठे होत असतो काय ? असा अपप्रचार करत होते
सन २०१४ नंतर तलावाच्या कामाला गती आली नाही परंतु तत्कालीन आ.भीमराव धोंडे यांनी समंजसपणे तलाव व्हावा अशीच भूमिका घेतली..
मात्र महा विकास आघाडीच्या काळात आ.बाळासाहेब आजबे यांनी या खुंटेफळ साठवण तलावासाठी काहीही केले नाही त्यांच्या काळामध्ये १ गुंठा देखील भूसंपादन झालेले नाही तसेच जी कामे आमदारांनी करायचे असतात ती कामे आम्हालाच करावी लागली दोन गावांच्या पुनर्वसनासाठी जन सुनावणी घेत असताना तात्कालीन जि.प.सदस्य बाळासाहेब आजबे गैरहजर होते यावरूनच त्यांचे या परिसरातील शेतकऱ्यां विषयी किती कळवळा आहे ? हे सिद्ध होते.. बाळासाहेब आजबे हे सध्या सत्ताधारी पक्षांचे सहयोगी सदस्य असल्यामुळे ते देखील सत्तेत आहेत त्यांनी ह्या तलावाच्या संबंधित भूसंपादन आणि इतर सर्व तक्रारींचे उत्खनन करावे त्यासाठी मी त्यांना टिकाव, खोरे, फावडे तसेच जेसीबी आणि गरज लागल्यास
टू टेन पोकलेन हे साहित्य पुरवण्याची माझी तयारी आहे मात्र भूसंपादन क्षेत्रांमध्ये माझ्या आडनावाचा किंवा माझ्या नातेवाईक जर आढळून आला नाही तर बाळासाहेब आजबे काय प्रायश्चित्त घेणार आहात ? आरोप सिध्द झाल्यास
मी विधानसभा लढणार नाही आणि आरोप सिद्ध झाला नाही तर तुम्ही सुद्धा राजकारण निवृत्त व्हावे असे माझे आव्हान आहे असे सांगत आमदार धस पुढे म्हणाले की आमदार बाळासाहेब आजबे हे काही दिवसांपूर्वी अजित दादा पवार यांना जेलमध्ये घालणार आहोत अशा वल्गना करत होते याचाही पुरावा आपल्याकडे असून योग्य वेळ आल्यावर आपण तो दाखवू असा घणाघाती आरोप देखील आ. सुरेश धस यांनी केला आहे
ते पुढे म्हणाले की,
महायुतीचे भाजपा शिवसेनेचे सरकार आल्यानंतर मी रोजगार हमी अंतर्गत पाणंद रस्ते या कामांना स्थगिती दिली कारण गोरगरीब शेतकऱ्यांच्या जलसिंचन विहिरी आणि शेततळ्याच्या कामासाठी आणि दीन दलित वर्गातील घरकूल लाभार्थ्यांसाठी मजूर उपलब्ध झाले नसते कारण गुत्तेदारांसाठी असलेल्या पाणंद रस्त्याच्या कामासाठी मजूर गेल्यानंतर या गोरगरिबांच्या कामासाठी अडचणी आल्या असत्या २०० गुत्तेदारांसाठी २००० शेतकऱ्यांची अडचण नको यासाठी आपण ही कामे थांबवली होती असे सांगून आ. सुरेश धस पुढे म्हणाले की,
आष्टी तालुक्यातील पंचायत समिती मार्फत करण्यात आलेली शेत तलाव आणि जलसंचन विहिरी यांची उत्कृष्ट पद्धतीने कामे करण्यात आलेली आहेत
महाविकास आघाडीच्या काळामध्ये आ. बाळासाहेब आजबे यांनी शिम्पोरा ते खुंटेफळ साठवण तलाव या थेट पाईपलाईनचे ईपीसी पद्धतीचे सर्वेक्षण केले या मध्ये या कामावर शासनाचे नियंत्रण नसते.. तसेच तात्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या विशेष आवडत्या कंपनी असलेल्या महालक्ष्मी आणि लक्ष्मी इंजिनियर्स या ईपीसी कंपनीकडे हे काम देण्यात आले होते त्यामुळे आपण त्याऐवजी ते रद्द करून बी वन टेंडर साठी प्रयत्न केले आणि सरकार बदलल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जलसंपदा विभाग असल्याने त्यांनी या योजनेचे टेंडर काढण्यास परवानगी दिली आणि हे काम सध्या निविदा स्तरावर आहे
आ.आजबे यांच्या काळामध्ये त्यांनी जे काम केले पाहिजे ते आम्ही केले या तलावासाठी ४६ हेक्टर भूसंपादन दर निश्चितीसाठी आपण स्वतः दि.२८/०८/२०२३ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून दर निश्चित केला या प्रस्तावाला तात्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मान्यता दिलेली आहे भाजपा शिवसेनेचे सरकार स्थापन होताच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दि.१३ जुलै २०२३ रोजी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला हिरवा कंदील देऊन मराठवाड्यासाठी २०,००० कोटीची निधी तरतूद केली आहे आष्टी रेल्वे शुभारंभ प्रसंगी आपण मागणी करताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ ११ दिवसात या योजनेला मान्यता देऊन एकूण ११,७२६ कोटी रुपये मंजूर केले त्यापैकी २८००कोटी रू. मंजूर केलेले आहेत आ.आजबे महोदयांनी खुंटेफळ साठवण तलावातील भूसंपादनासाठी त्यातील कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,वन विभाग,यांची कामे करायला पाहिजे होती ती आम्ही केली त्यांनी मात्र आमच्या विरोधात तथाकथित सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्या मार्फतीने देवस्थान जमीन प्रकरणी तक्रारी दाखल करून तीनदा चौकशी करायला लावून नंतर एसआयटी स्थापन करून शासनाच्या दबाव वापरून आमच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुन्हा दाखल करायला लावलेला आहे तसेच आठवण तलावातील कठीण भ्रष्टाचाराच्या पाच तक्रारी राम खाडे यांनी केले आहेत मात्र राम खाडे हे नाममात्र असून या प्रकरणाचा बोलविता धनी आ.बाळासाहेब आजबे हेच आहेत कारण मुंबई येथील राम खाडे यांचे उपोषण आंदोलन सोडवण्यासाठी आ.आजबे उपस्थित होते तसेच शरद पवार साहेबांकडे त्यांना आ. बाळासाहेब आजबे हेच घेऊन गेले होते असा स्पष्ट आरोप करून आ. सुरेश धस पुढे म्हणाले की आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य मतदार संघातील निवडणुका भारतीय जनता पार्टी आमदार सुरेश धस आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह स्वतंत्रपणे लढणार आहोत असे सांगून कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीच्या कोणत्याही गटाशी आम्ही युती करणार नाही असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे बाळासाहेब आजबे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये सर्वसामान्य त्यांच्या कार्यकर्त्यांना काहीही दिले नसून विकास कामातील रस्ते कामासाठी पेविंग ब्लॉक त्यांचेच, वाळू त्यांचीच, गावोगावी त्यांनी बसवलेले हाय मॅक्स देखील त्यांनीच बसवलेले आहेत.. त्यांनी आमच्या भ्रष्टाचारावर बोलणे हे हास्यास्पद असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले
*********************
बोलवता धनी बाळासाहेब आजबे
******************
या खुंटेफळ साठवण तलावातील कामाच्या तक्रारी बाबत चौकशी आ.बाळासाहेब आजबे यांनी आपल्या उर्वरित दीड वर्षाच्या काळात जरूर करावी तसेच महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये माझ्या विरुद्ध तक्रारी करणारे राम खाडे हे नाममात्र होते या तक्रारींचे बोलविता धनी आ. बाळासाहेब आजबे हेच आहेत..
तर विधानसभा लढविणार नाही आरोप सिद्ध नाही झाला तर तुम्ही लढवायची नाही
----आ.धस
******************
खुंटेफळ साठवण तलाव क्षेत्रामध्ये बाहेरच्या लोकांनी जमिनी घेतलेल्या आहेत असा आरोप आमदार आजबे यांनी केला आहे परंतु माझे त्यांना आव्हान आहे की खुंटेफळ साठवण तलाव भूसंपादन क्षेत्रांमध्ये धस आडनावाचा एखादा ही कार्यकर्ता असेल तर मी आगामी विधानसभेची निवडणूक लढणार नाही परंतु पोकळ आरोप करून जर हा आरोप सिद्ध झाला नाही तर आ. बाळासाहेब आजबे यांनी देखील राजकारणातून निवृत्त व्हावे असा घणाघाती आरोप आ.सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला..बाळासाहेब आजबे हे सध्या सत्ताधारी पक्षांचे सहयोगी सदस्य असल्यामुळे ते देखील सत्तेत आहेत त्यांनी ह्या तलावाच्या संबंधित भूसंपादन आणि इतर सर्व तक्रारींचे उत्खनन करावे त्यासाठी मी त्यांना टिकाव, खोरे, फावडे तसेच जेसीबी आणि गरज लागल्यास टू टेन पोकलेन हे साहित्य पुरवण्याची माझी तयारी आहे मात्र भूसंपादन क्षेत्रांमध्ये माझ्या आडनावाचा किंवा माझ्या नातेवाईक जर आढळून आला नाही तर बाळासाहेब आजबे काय प्रायश्चित्त घेणार आहात ? आरोप सिध्द झाल्यास मी विधानसभा लढणार नाही आणि आरोप सिद्ध झाला नाही तर तुम्ही सुद्धा राजकारण निवृत्त व्हावे असे माझे आव्हान आहे असे सांगत आमदार धस पुढे म्हणाले की आमदार बाळासाहेब आजबे हे काही दिवसांपूर्वी अजित दादा पवार यांना जेलमध्ये घालणार आहोत अशा वल्गना करत होते याचाही पुरावा आपल्याकडे असून योग्य वेळ आल्यावर आपण तो दाखवू असा घणाघाती आरोप देखील आ. सुरेश धस यांनी केला आहे...
*******************
स्थानिक निवडणूका भाजपा आणि शिवसेना स्वबळावरच महायुती नाही
----आ.धस
***********************
स्थानिक स्वराज्य मतदार संघातील निवडणुका भारतीय जनता पार्टी आमदार सुरेश धस आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह स्वतंत्रपणे लढणार आहोत असे सांगून कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीच्या कोणत्याही गटाशी आम्ही युती करणार नाही असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले


stay connected