Annabhau sathe : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीच्या अध्यक्षपदी अजय बोराडे तर उपाध्यक्षपदी अविनाश जाधव यांची सर्वानुमते निवड..!
-------------------
संदिप जाधव/आष्टी
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 10 जुलै रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत अध्यक्षपदी अजय बोराडे उपाध्यक्षपदी अविनाश जाधव तर सचिव पदी विक्की कर्डीले, कोषाध्यक्ष पदी संदिप शिरोळे व श्याम शिरोळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
आष्टी तालुक्यातील कडा येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती ची बैठक माजी सरपंच रमेश शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीला सर्व जाती धर्मातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
या बैठकीमध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष पुढे बोलताना म्हणाले की माझी आपण सर्वांनी जयंतीच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आण्णाभाऊ साठे यांची जयंती वेगवेगळे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात येईल. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती १ ऑगस्ट रोजीच साजरी करण्यात येईल. आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
यावेळी सनी शिरोळे दीपक गरुड बबलू आखाडे विशाल घोडके संभाजी ओव्हाळ सर, संतोष जाधव किशोर घोडके,अर्शद सय्यद, विशाल जाधव, विठ्ठल शिंदे,बिराजदार भंडारी, सचिन जाधव, बंटी घोडके,कमलेश जाधव, अशोक शिंदे, विशाल शिरोळे, सूर्या शिरोळे, नितीन शिरोळे सोनू शिरोळे सह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


stay connected