ठाणे हद्दीत कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवणार- सपोनि महादेव ढाकणे
घाटा पिंपरी सुरेश कांबळे - ठाणे हद्दीतील लोकांच्या अडीअडचणी ज्या कि,पोलिस खात्याशी निगडित असतील , त्या सोडवल्या जातील.निसंकोच पणे लोकांनी त्या सांगाव्यात,मांडाव्यात त्या सोडवुन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल असे प्रतिपादन नव्याने पदभार घेतलेले अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी घाटापिंपरी येथे ग्रामस्थानी केलेल्या सत्कार प्रसंगी बोलताना केले.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांची नुकतीच बदली झाल्याने रिक्त झालेल्या जागी बीड शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी पदभार घेतला.यावेळी बोलताना ते म्हणाले की, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, बीड या ठिकाणी काम करत असताना सामाजिक सलोखा राखत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन कायम सोबत असल्याने आता अंभोरा ठाणे हद्दीत देखील चांगले काम करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली जाईल. नागरिकांनी निसंकोच पणे अडचणी सांगाव्यात असे त्यांनी सांगितले.
यावेळी घाटा गावचे सरपंच प्रल्हाद मुळिक, पिंपरीचे माजी सरपंच अशोक वायभासे, देवळालीचे सरपंच पोपट शेकडे, उद्योगपती संदिप शिंदे, पत्रकार नितीन कांबळे, सुरेश कांबळे,पोपट तळेकर, बबन तळेकर, नवी मुंबई येथील शिवसैनिक रमेश बर्डे, महादेव झांजे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
stay connected