Collector यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुख अधिकारी व shetkari Sangathna ची आढावा बैठक : शेख अजिमोद्दीन
( आष्टी / प्रतिनिधी ) - मा.जिल्हाधिकारी महोदया यांचें अध्यक्षतेखाली दिनांक २१जूलै २०२३ शुक्रवार रोजी दूपारी ४ वाजता प्रगती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे शेतकऱ्यांचे खालील अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक विभागातील प्रमुख अधिकारी व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांचें समवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीतील महत्वाचे विषय अतिवृष्टी,अवकाळी अनूदान, पीक विमा,पिक कर्ज,बॅक खाते होल्ड,कर्जमाफी,दूहेरी व्याज वसूली,कृषीकर्ज, शैक्षणिक कर्ज, महामंडळ कर्ज प्रकरणे,सक्तीची कर्ज वसूली हे बॅकेचे विषयाबाबत.
बाजार समितीत आधार भूत किंमत मिळावी,सहकार कायदा ३४ड ची अंमलबजावणी करणे,दोन किलो वजन बेकायदा कापणे,बारदाना पैसे परत न देणे,इ.विषय बाजार समिती बाबतीत आहेत.
महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभार झिरो लोकांनी चालवला आहे.विज वितरण कंपनीने ग्राहक संरक्षण कायदा अंमलबजावणी केली नाही .नूकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ जळीत उसाची नूकसान भरपाई त्वरीत देणे.झिरो व आउटसोर्सिंग चे खाजगी लोकांना ठेवून काम पाहिले जाते त्यामुळे ते अनूभवशून्य असल्याने वांरवार तरणीबांड पोरं मरत आहेत आष्टी तालुक्यातील दोन वायरमन पोरांचा बळी गेला.दोन शेतकरी पोरं गेली त्यामुळे सबस्टेशन मध्ये खाजगी लोकांना बंदी घालण्यात यावी झिरो व आऊटसोर्सिंग च्या नावाखाली चाललेला कारभार थांबवावा.झिरो व आऊटसोर्सिंग जेथे तेथे राजकारण होते व ग्राहकांना नाहक त्रास होतो.गावठाण हद्दीतील जिर्ण झालेल्या तारा बदलने सौरपंप,इ.महाविरतणचे विषयावर चर्चा होईल.
कृषी विभागातील विविध प्रकारचे रखडलेले अनूदान,पिक विमा,खते,बियांणे, किटकनाशके यावर नियंत्रण ठेवणे.विवीध कृषी योजना इ.बाबत चर्चा केली जाईल.
वन्यप्राणी उपद्रव,अशा अनेक विषयांवर चर्चा केली जाईल त्यासाठी मा.जिल्हाधिकारी यांनी खालील सर्व विभाग प्रमूखांना स्वतः हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
यासाठी उप जिल्हाधिकारी रोहयो बीड,अधीक्षक अभियंता महावितरण बीड,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड, जिल्हा निबंधक सहकारी संस्था बीड, विभागीय वन अधिकारी बीड,व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक अधिकारी बीड, जिल्हा व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र बीड, जिल्हा व्यवस्थापक वसंतराव महामंडळ बीड, जिल्हा व्यवस्थापक ओ.बी.सी.महामंडळ बीड, जिल्हा व्यवस्थापक अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ बीड,जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ बीड, जिल्हा व्यस्थापक अण्णाभाऊ साठे महामंडळ बीड त्याच प्रमाणे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सी ई.ओ जिल्हापरिषद बीड व जिल्ह्यातील सर्व बॅक अधिकारी यांना बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आदेशीत केले ही आढावा बैठक सर्व शेतकरी संघटना कार्यकर्त्या समवेत आयोजित केली तरी बीड जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बैठकीला वेळेचे बंधन पाळत हजर राहण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी केले आहे.या बैठकीसाठी शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष मा.कालिदास अपेट व महाराष्ट्र राज्य यूवा आघाडी अध्यक्ष मा.रामेश्वर गाडे उपस्थित राहणार आहेत .
तरी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी आपल्या अडचणी संदर्भातील सर्व कागदपत्रासह हजर राहण्याचे आवाहन बीड जिल्हा शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मार्फत करण्यात आले आहे.



stay connected