Breaking News हळगाव येथील शेततळ्यात आढळले महिला व तिच्या दोन मुलाचे मृतदेह घातपात की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क परिसरात खळबळ crime news
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण )
जामखेड - तालुक्यातील हळगाव येथे शेत तळ्यामध्ये दोन स्री जातीचे व एक पुरुष जातीचे असे एकूण तीन मृतदेह पाण्यामध्ये बुधवारी आढळून आले. पोलिसांनी सदर मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून तेथेच वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. या घटनेमुळे हळगाव व पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे. सदर तिघेजण आई व तिचे मुले असून
घातपात आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करीत असून सध्या आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी चार वाजता हळगाव पोलीस पाटील सुरेश ढवळे यांनी फोन वरून खबर दिली की हळगाव येथील भीमराव माहदू पिंपळे यांच्या शेत गट नंबर 434 मधील शेत तळ्यामध्ये दोन स्री जातीचे व एक पुरुष जातीचे असे एकूण तीन मृतदेह पाण्यामध्ये तरंगत आहेत. पोलिस पाटील यांनी कळविले की सदरचे प्रेत हे हळगाव गावातील असून ते चांदणी उर्फ उमा बबन पाचरणे (वय 31), दिपाली बबन पाचारणे (वय 11), राजवीर बबन पाचारने (वय 8) यांचे आहेत. सदर घटना समजताच पोलीस निरीक्षक महेश पाटील, सपोनी सुनील बडे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. शेततळ्यातून गावकऱ्यांच्या मदतीने तीनही मृतदेह तलावाच्या बाहेर काढून तेथेच दोन वैद्यकीय अधिकारी यांना बोलून त्यांच्या करवी शवविच्छेदन करण्यात आले आहे.
जामखेड पोलीस स्टेशनला दि. 10 रोजी सायंकाळपासून सदर महिला व दोन मुले ही हरवली होती. त्याबाबत दिनांक 11 रोजी पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली होती. व दिनांक 12 रोजी मृतदेह मिळाले आहेत. पोलीसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बडे हे करीत आहेत.
प्रतिनिधी नासीर पठाण सह पत्रकार आशोक निमोणकर जामखेड .




stay connected