सोयाबीन बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्याचे पंचनामे करा-प्रवीण खोडसे
बोगस बियाणे दिल्यामुळे संबंधित कंपनीवर कार्यवाही करण्याची काँग्रेसच्या केज तालुका अध्यक्षाची मागणी !
केज/प्रतिनिधी
सध्या शेतकरी वर्ग आर्थीक आडचणीत सापडला आहे तरी अशातच महाबिज व इतर कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवले नाही यामुळे शेतकरी जास्तच संकटात सापडला आहे.
सोयाबीन बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्याचे बोगस बियाणे दिल्यामुळे संबंधित कंपनीवर कार्यवाही करावी या करीता (दि.१७) जुलै २०२३ रोजी केज तहसील येथे भारतीय काँग्रेस पक्षाचे केज तालुका अध्यक्ष प्रवीण खोडसे यांनी निवेदन दिले आहे.सोयाबीन बीयाणे न उगवलेल्या शेतकऱ्याचे शेतीचे पंचनामे करुन आर्थीक मदत करावी अशी मागणी निवेदन पत्रात करण्यात आली आहे. केज तहसीलचे नायब तहसीलदार धस यांच्याकडे निवेदन पत्र सादर करताना भारतीय काँग्रेस पक्षाचे केज तालुका अध्यक्ष प्रवीण खोडसे,मा.सरपंच मधुकर तपसे,अमोल थोरात,राजकुमार धीवार,रंजीत घाडगे व इतर उपस्थित होते.


stay connected