रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे हात बळकट करणार.!अजय गोरे
-----------------
अंबाजोगाई/प्रतिनिधी
शहरातील शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाई येथे रिपब्लिकन युवा सेनेची बैठक युवा जिल्हाध्यक्ष अजय गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बीड जिल्ह्यात रिपब्लिकन युवा सेनेच्या माध्यमातून सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी विविध पदांच्या निवडी करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने तालुक्याच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. अंबाजोगाई युवा तालुकाध्यक्ष पदी समाधान महादेव मस्के यांची तर रमाकांत तुळशीराम तरकसे यांची युवक तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली युवक प्रदेशाध्यक्ष किरण भाऊ घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन समाजातील उपेक्षित शोषिताना न्याय मिळवून देण्यासाठी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक व राजकीय काम तन, मन, धनाने करून गाव तसेच शहरातील वाडी-वस्तीत रिब्लिकन सेनेच्या शाखा स्थापन करून सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचे हात बळकट करावेत असे युवा जिल्हाध्यक्ष अजय गोरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले.
यावेळी तालुका अध्यक्ष बापूसाहेब टेकाळे, उत्तम पोटभरे, जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब हानवते, दादाराव लोंढे, धनराज रेणापुरे, शेषेराव गायकवाड, आमीन शेख, शकील मोमीन, उत्कर्ष वेडे, तुकातम चाटे, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


stay connected