कुंबेफळ येथील युवा नेते- अमोल बयाजी काकडे यांचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थीयांना शालेय साहित्य देऊन साजरा
धानोरा (प्रतिनिधी ) -- आमदार सुरेश आण्णा धस व हनुमान जंजीरे युवा मंच लोणी गट.. यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते, युवा नेते- कुंबेफळ येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमोल बयाजी काकडे, यांचा वाढदिवस आज जि.प.प्रा.शाळा कुंबेफळ येथे शाळेतील सर्व विद्यार्थांना शालेय साहित्य, पाणी बॅाटल, चित्रकला वही, एकत्रीत वही, सुलेखन पुस्तक, व शाळेला एक उषा कंपनीचा टेबल फॅन भेट म्हनून देण्यात आला. व तसेच सर्व विद्यार्थांना खाण्यासाठी समोसे व जिलेबी देण्यात आली, शाळेच्या वतीने अमोल काकडे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. अशा पद्धतीने म्हनजे कुठे केक, फेटा DJ असा इतर कुठे वायफट खर्च न करता अतिशय अगळ्या- वेगळ्या पद्धतीने नविन उपक्रम राबवून एक नविन पिढीला एक चांगला आदर्श घडवून व दाखवून दिला. असेच म्हनावे लागेल. सर्व आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व सर्व ग्रामस्थ कुंबेफळ इ अदी मान्यवर यावेळी उपस्थीत होते.


stay connected