Suresh Dhas यांच्या प्रयत्नाने सीना नदीवरील 6 को.प.बंधाऱ्यांचे Latur Type barrage मध्ये रूपांतर होणार
मुख्य अभियंता जलसंपदा पुणे यांची प्रशासकीय मान्यता...
आष्टी (प्रतिनिधी)
सीना नदीवरील ६ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे जुने झाल्यामुळे त्यांचे रूपांतर लातूर टाईप बॅरेज मध्ये करण्यात येणार आहे.. अशी माहिती आ. सुरेश धस यांनी दिली..
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की,
सीना नदीवरील २५ ते ३० वर्षांपूर्वी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे जिल्हा परिषद आणि जलसंपदा विभाग विभागामार्फत बांधण्यात आलेले आहेत..
हे बंधारे बरेच वर्षापासूनचे असल्यामुळे त्यामध्ये पाणी साठा होत नाही त्यामुळे सिंचनही होत नाही..
आष्टी तालुक्यातील सततची दुष्काळी परिस्थिती आणि सर्व ठिकाणी सारखा पाऊस होत नसल्यामुळे पावसाचे पाणी साठा कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांमध्ये पाणीसाठा करणे शक्य होत नाही आणि गेट टाकून पाणीसाठा केला..
तरीही गेटमधून आणि बंधाऱ्याच्या पायामधून होणाऱ्या गळतीमुळे पाणी टिकून रहात नाही.. याबाबत या सहाही बंधाऱ्यांच्या परिसरातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी केल्यामुळे आपण जलसंपदा विभागाकडे याबाबत सतत पाठपुरावा केल्यामुळे..
मुख्य अभियंता विप्र जलसंपदा विभाग पुणे यांनी जा.क्र. मु.अ.( विप्र )/उअ-४ दि.१९जुलै २०२३ रोजी या ६ कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांचे रूपांतर लातूर टाईप गॅरेज मध्ये करण्याच्या सर्वेक्षण आणि अन्वेषण कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे अधीक्षक अभियंता, उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ उस्मानाबाद यांच्या अधिपत्याखालील सीना नदीवरील..
१) पिंपरी घुमरी को.प.बंधारा
२) पिंपळसूटी को.प. बंधारा
३) खडकत को.प. बंधारा क्र. १
४) खडकत को.प.बंधारा क्र.२
५) सांगवी को.प.बंधारा आणि
६ ) सांगवी नागापूर को.प.बंधारा
या सहा बंधाऱ्यांचे रूपांतर लातूर टाईप बॅरेज मध्ये करण्याच्या कामाचे सर्वेक्षण आणि अन्वेषणाचे काम करण्यासाठी ३९ लक्ष ७४ हजार ५६२ रु.
एवढ्या खर्चाच्या सर्वेक्षण व अन्वेषण अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे..
या सहाही को.प. बंधाऱ्यांचे रूपांतरण उचल पद्धतीच्या द्वारमुक्त बॅरेज मध्ये करण्यात येणार असून त्यामुळे वर्षभरात केव्हाही पडणाऱ्या पावसाचे पाणी या बॅरेज मध्ये अडवणे शक्य होणार आहे..
त्यामुळे शाश्वत पाणीसाठा निर्माण होऊन सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे अशी माहितीही शेवटी आ.सुरेश धस यांनी दिली आहे
अशा पद्धतीने कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांचे रूपांतर लातूर टाईप बॅरेज मध्ये करण्यात येणार असल्यामुळे या सहाही कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे


stay connected