जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारोडी येथील रोपवाटिकेतील रोपांची लागवड
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारोडी यांनी शाळेमध्येच विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध रोपांची रोपवाटिका तयार केली आहे. या रोपवाटिकेतील वृक्षांची लागवड म्हसोबा शेतकरी महिला गटाच्या मदतीने रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आली.
या शाळेने विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेमध्ये 500 रोपांची रोपवाटिका तयार केलेली आहे. विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यामध्ये या रोपांची योग्य निगा राखल्यामुळे ही रोपे लागवडीसाठी तयार आहेत. या रोपवाटिकेतील रोपे इतर शाळांना मोफत वाटप करण्यात येतील. असे प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ.सतीश सायंबर यांनी सांगितले.
या वृक्षारोपण कार्यक्रमास म्हसोबा शेतकरी महिला गटाच्या सर्व महिला उपस्थित होत्या. त्याचबरोबर गावच्या सरपंच श्रीमती प्रतिभाताई परकाळे प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. सतीश सायंबर सहशिक्षक श्री विठ्ठल शिंदे. पाणी फाउंडेशनचे श्री प्रवीण काथवटे व वाटर ऑर्गनायझेशन ट्रस्ट चे महेश म्हस्के व नितीन आदमाने यांच्यासह शिक्षण प्रेमी नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.



stay connected